पर्यावरणात होत असणारे नैसर्गिक बदल, त्यातच वाढलेला मानवी हस्तक्षेप आणि पुढील काळात उद्भवणारे संकट अशा पर्यावरणाच्या पेचाचा अर्थ कसा लावायचा यावर ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात उद्या, (४ जून) पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर मार्गदर्शन करतील.  गेल्या काही वर्षांत पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप वाढला आहे.  टाळेबंदीच्या काळात हवेचे प्रदूषण लक्षणीयरित्या कमी झाल्याने मानवाची पर्यावरणातील ढवळाढवळ स्पष्टपणे दिसून आली. या सर्वातून ‘विकास की पर्यावरण’ असा तिढादेखील निर्माण होतो. या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ४ जूनला गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हा विशेष वेबसंवाद होईल.

सहभागी होण्यासाठी..  https://tiny.cc/LS_Vishleshan_4June या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.