19 January 2021

News Flash

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी तळ ठोकूनही नाही जिंकता आलं वैजापूर, शिल्पा परदेशी नवीन नगराध्यक्ष

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा परदेशी या १७६४ मतांनी निवडून आल्या. त्यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला.  वैजापूर नगरपरिषदेत एकूण २३ जागा आहेत. त्यातील १३ जागा शिवसेनेने, भाजपाने ९ आणि काँग्रेसने फक्त एका जागेवर विजय मिळवला.

शिल्पा परदेशी यांचे पती दिनेश परदेशी काँग्रेसमध्ये होते. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेतले व त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. भाजपाला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत याचा फायदा झाला आहे.

शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे वैजापूरमध्ये तळ ठोकून होते तरीही त्यांना नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 2:01 pm

Web Title: aurangabad waijapur shilpa shinde
टॅग Aurangabad
Next Stories
1 ‘सॉरी भावा…बाय बरं का, घरच्यांना सांग’, आत्महत्या करण्यापूर्वी सचिनने केला होता मित्राला फोन
2 कीर्तन दुय्यम; राजकीय भाषणाला प्राधान्य!
3 कबुतरांच्या जगात लाखोंची गुटर्रगुं! 
Just Now!
X