News Flash

रिक्षा-टॅक्सीचालकांचा बेमुदत संप तूर्त मागे

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता

गेल्या महिन्यात याच मुद्दय़ावर रिक्षा-टॅक्सी चालकांचा एक दिवसाचा संप करणाऱ्या जय भगवानदादा महासंघाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता.

ओला, उबेर या खासगी टॅक्सीचालकांविरोधात मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी मंगळवारपासून पुकारलेला प्रस्तावित बेमुदत संप तूर्त मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप तूर्त मागे घेत असल्याचे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संघटनेने जाहीर केले.
गेल्या महिन्यात याच मुद्दय़ावर रिक्षा-टॅक्सी चालकांचा एक दिवसाचा संप करणाऱ्या जय भगवानदादा महासंघाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणेच खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही या संघटनेची प्रमुख मागणी आहे. या संपात ९० टक्के रिक्षा-टॅक्सी सहभागी होणार असल्याचा दावा महासंघाने केल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला असता.
उबर, ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांनाही सरकारी नियमाची बंधने घालायला हवीत, त्यांचे दरपत्रक निश्चित करायला हवे, अशा मागण्यांसाठी विविध रिक्षा-टॅक्सी संघटना गेली दोन वर्षे आंदोलन करत आहेत. गेल्या महिन्यात २१ जून रोजी जय भगवानदादा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा फटका मुंबईकरांना बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 5:59 pm

Web Title: auto and taxi drivers strike cancelled in mumbai
Next Stories
1 शिवसेना आणि भाजपमध्ये सुसंवाद राखणारा कुणी नेता उरला नाही – उद्धव ठाकरे
2 ‘बेस्ट’ प्रवाशांकडून वाहकांविरोधात ३९१ तक्रारी!
3 विधिमंडळ अधिवेशन : उपसभापतिपदाची काँग्रेसला प्रतीक्षाच!
Just Now!
X