07 March 2021

News Flash

विकृतीचा कळस! मुंबईत रिक्षाचालकाचे महिलेसमोर हस्तमैथुन

महिला सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विकृतीचा कळस काय असतो त्याचा प्रत्यय मुंबईत एका महिलेला आला आहे. त्यामुळे हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या महिलेसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेने या संदर्भातली पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मालाड लिंक रोडवरील इन्फिनिटी मॉल या ठिकाणाहून या महिलेने रिक्षा प्रवास सुरू केला.

तिला बोरीवली या ठिकाणी जायचे होते. जेव्हा तिची रिक्षा कांदिवली भागात आली तेव्हा तिला एक फोन आला. जेव्हा ती फोनवर बोलत होती तेव्हा रिक्षा चालकच्या हालचाली तिला खटकल्या. सुरूवातीला तिला वाटले की तो नीट बसण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र त्यानंतर त्याच्या या हालचाली वाढल्या आणि तो रिक्षावाला हस्तमैथुन करत असल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार तिने आपल्या मित्राला फोनवर सांगितला.

बोरीवली पर्यंत जात असताना ज्या ठिकाणी रस्त्यावर कोणी नसेल अशा ठिकाणी रिक्षा चालकाच्या हालचाली वेगाने होत होत्या. जेव्हा तो हस्तमैथुन करतो आहे हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी रिक्षा सोडून तिथून पळ काढला. त्यावेळी काही लोक तिथे उभे होते मात्र कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही असेही या महिलेने सांगितले. जेव्हा ही घटना लक्षात आली तेव्हा माझे घर काही अंतरावरच होते, मी पोलिसात तक्रार नोंदवली तसेच घडला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला असे या महिलेने स्पष्ट केले. तसेच आता पोलीस महिलेने दिलेल्या माहितीनंतर रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

मागील वर्षीही एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेनमध्ये महिलांसमोर हस्तमैथुन करण्याचे प्रकार उघडकीला आले होते. या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा लोकांवर पोलीस काय कारवाई करतात? हा प्रश्नही विचारला जातो आहे. तसेच अशा विकृतांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचीही मागणी होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 4:45 pm

Web Title: auto dirver masturbates in front of woman in mumbai
Next Stories
1 विचित्र योगायोग! ९ वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या स्मशानभूमीतच गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
2 मुंबईतील ५६ हजार इमारती ‘ओसी’विना
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X