News Flash

मुंबईत महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

मालाड ते बोरीवली प्रवासा दरम्यान महिलेसमोरच हसतमैथुन करणाऱ्या रिक्षा चालकाला शुक्रवारी गोराई येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मालाड ते बोरीवली प्रवासा दरम्यान महिलेसमोरच हसतमैथुन करणाऱ्या रिक्षा चालकाला शुक्रवारी गोराई येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. राजबहादूर पाल (४०) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश जौनपूरचा निवासी आहे. प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेने बुधवारी रात्री मालाड लिंक रोडवरच्या इन्फिनिटी मॉल जवळून बोरीवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. त्या दरम्यान हा चालक रिक्षामध्येच हस्तमैथुन करत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले होते.

संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर बारा तासांच्या आत आरोपीला अटक केली. गुन्हा केल्यानंतर पाल दोन दिवस घरातून बाहेरच पडला नाही असे बोरीवली पोलिसांनी सांगितले. त्याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. बुधवारी रात्रीच्या सुमारास मालाड लिंक रोडवरील इन्फिनिटी मॉल या ठिकाणाहून या महिलेने रिक्षा प्रवास सुरू केला. तिला बोरीवलीला जायचे होते. जेव्हा तिची रिक्षा कांदिवली भागात आली तेव्हा तिला एक फोन आला.

जेव्हा ती फोनवर बोलत होती तेव्हा रिक्षा चालकच्या हालचाली तिला खटकल्या. सुरूवातीला तिला वाटले की तो नीट बसण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र त्यानंतर त्याच्या या हालचाली वाढल्या आणि तो रिक्षावाला हस्तमैथुन करत असल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार तिने आपल्या मित्राला फोनवर सांगितला. बोरीवली पर्यंत जात असताना ज्या ठिकाणी रस्त्यावर कोणी नसेल अशा ठिकाणी रिक्षा चालकाच्या हालचाली वेगाने होत होत्या. जेव्हा तो हस्तमैथुन करतो आहे हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी रिक्षा सोडून तिथून पळ काढला. त्यावेळी काही लोक तिथे उभे होते मात्र कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही असेही या महिलेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:11 pm

Web Title: auto driver arrested who mast masturbated front of women
Next Stories
1 माळशेज घाटातील वाहतूक सुरू, मात्र पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश
2 संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांशी संबंध, घाटकोपरमधून एकाला अटक
3 मेट्रोच्या रात्रकामाला परवानगी!
Just Now!
X