परिवहन विभागाने राज्यातील विविध उपविभागीय प्रादेशिक कार्यालयातून रिक्षा परवान्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाइन प्रक्रियेस भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ३१ जानेवारी २०१४ पर्यंत परिवहन विभागाकडे ६९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६९ हजार इतकी आहे.
६९,३०९ परवाना वाटपासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दाखल झालेल्या एकूण अर्जापैकी ५६ हजार अर्जाचे प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे प्रक्रिया शुल्कही परिवहन विभागाकडे जमा झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशात ४५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी १२ हजार अर्ज भरले गेले होते. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अनुक्रमे २० हजार, १७ हजार आणि १५ ?हजार अर्ज भरले गेले. हे अर्ज राज्यातील सहा हजारांहून अधिक ई-सेवा केंद्रातून भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून मुंबईत ऑनलाईन अर्ज भरण्याची ७० केंद्रे आहेत. अर्ज भरण्यात काही अडचण आली किंवा मार्गदर्शन हवे असेल तर ०२२-६१३१६४०० या हेल्पलाइनवर सकाळी ९.३० ते रात्री ९.३० या वेळेत (सुट्टीच्या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.