21 September 2020

News Flash

रिक्षात बसण्यास नकार देणाऱ्या तरुणीसमोर रिक्षाचालकाचे हस्तमैथुन

यापुर्वीही आपण असे प्रकार केले असल्याची कबुली या रिक्षा चालकाने दिली

रिक्षाचालकाचे अश्लील चाळे

मुंबईमधील लिंक रोड परिसरामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षा चालकाने तरुणी आपल्या रिक्षात बसली नाही म्हणून तिच्यासमोरच हस्तमैथुन केल्याची घटना १ सप्टेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणात संबंधित तरुणीने या रिक्षा चालकाविरोधात पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १ सप्टेंबरच्या रात्री तक्रारदार तरुणी लिंकर रोडवरील चिंचोली बंदर परिसरातील बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. रात्री साडेअकराच्या सुमारास ही २० वर्षीय तरुणी बसची वाट पाहत एकटी उभी असल्याची पाहिल्यावर मोहम्मद शकील अब्दुल कादर मेमन या रिक्षाचालकाने एकदम तिच्या समोर येऊन रिक्षा थांबवली. मेमनने तरुणीला रिक्षात बसण्यास सांगितले. त्यावेळी तिने मला बसनेच जायचे असून मी रिक्षात बसणार नाही असं मेमनला सांगितलं. त्यावेळेस शकील रिक्षामध्ये खाली उतरला. आपल्या पॅण्टची चैन उघडून तो अश्लील चाळे करत तिच्याकडे येऊ लागला. यासंदर्भात तरुणीने आईला फोन करुन सांगितले. मात्र त्यानंतरही मेमनने अश्लील चाळे सुरुच ठेवले आणि नंतर तो या तरुणीसमोरच हस्तमैथून करु लागला.

घाबरलेल्या या तरुणीने आरडाओरड सुरु केला. त्यामुळे मेमनने रिक्षा तिथेच ठेऊन पळ काढला. तरुणीने आपल्या आईच्या मदतीने गोरेगाव पश्चिममधील बांगुर नगर पोलीस स्थानकात घडलेल्या घटनेची माहिती देत मेमनविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मेमनच्या शोध सुरु केला. त्यावेळी ३२ वर्षीय मेमन हा पूर्णवेळ रिक्षा चालवतो अशी माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटजे पाहिले. मालाड, गोरेगाव आणि दहिसर परिसरातील सर्व रिक्षा चालकांकडे मेमनबद्दल चौकशी करुन माहिती गोळा केली. अखेर पोलिसांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रोजी मेमनला मालवणी परिसरातून अटक केली. मेमनला अटक करुन चौकशी केल्यानंतर यापुर्वीही आपण असे प्रकार केले असल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 12:05 pm

Web Title: autorickshaw driver masturbating front girl denied scsg 91
Next Stories
1 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर संतप्त प्रवाशांच्या घोषणा
2 लालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड
3 समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती
Just Now!
X