19 January 2021

News Flash

‘काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा’

राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत

(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असा इशारा देत आघाडी धर्माचे पालन सर्वानी करावे, अशी अपेक्षा महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत, असाच सूचक इशारा यातून ठाकूर यांनी दिला आहे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव असल्याबाबतची प्रतिक्रिया एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:30 am

Web Title: avoid criticism of congress leadership yashomati thakur abn 97
Next Stories
1 तरुणाच्या मृत्युप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
2 सुमित्रा भावे यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’
3 वीज वितरणाचेही खाजगीकरण
Just Now!
X