News Flash

७२ लसीकरण केंद्रांना टाळे

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने समाजमाध्यमावरून या बंद केंद्रांची माहिती दिली होती.

साठा संपल्याने नागरिकांची परवड; दुसरी मात्रा घेऊ इच्छिणाऱ्यांची निराशा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत गेल्या आठवड्याभरापासून असलेला लशीचा तुटवडा अद्याप कमी झालेला नाही.  केंद्रासमोर तासन्तास रांगा लावूनही लस उपलब्ध न झाल्याने नागरिकांना परतावे लागत आहे. अनेकांना दुसरी मात्राही मिळू शकलेली नाही. शुक्रवारी दुपारनंतर ७२ केंद्रे बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली.

लशींच्या साठ्याअभावी शुक्रवारीही तब्बल ५४ केंद्रे बंद होती. तर लस साठा संपुष्टात आल्यामुळे १८ केंद्रे शुक्रवारी दुपारनंतर बंद करावी लागली. काही खासगी केंद्रांवर तर १५ दिवसांनी लस मिळेल असे फलक लावले होते. त्यामुळे नागरिक विशेषत: दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी जवळ आलेली मंडळी हवालदिल झाली आहेत.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने समाजमाध्यमावरून या बंद केंद्रांची माहिती दिली होती. तर १८ केंद्रे लससाठा असेपर्यंतच सुरू राहतील असेही सांगितले होते. यावर अनेक नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती के ली. लसीकरण केंद्रावर जाऊन लोक पुन्हा लस न घेताच परतावे लागत आहे. नागरिक केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत होते. मात्र कर्मचाऱ्यांनाच काही माहीत नसल्याचेच चित्र होते.

वांद्रे आणि अंधेरीत एक च केंद्र सुरू

मुंबईतील सर्व विभागांत किमान पाच ते सहा लसीकरण केंद्रे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी शुक्रवारी एक-दोन लसीकरण केंद्रेच सुरू होती. त्यातही वांद्रे, खार, सांताक्रू झचा पश्चिम भाग असलेल्या एच-पश्चिम विभागात दिवसभर एकच केंद्र सुरू होते. तर विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेचा भाग असलेल्या के  पश्चिमसाठीही एकच केंद्र सुरू होते. त्यामुळे या भागातील लोकांना आज दिवसभर मनस्ताप सोसावा लागला. एच-पश्चिममध्ये के वळ भाभा रुग्णालयात लसीकरण सुरू होते. तर के -पश्चिममध्ये के वळ कू पर रुग्णालयात लसीकरण सुरू होते. त्यामुळे ज्यांनी आधीची मात्रा खासगी रुग्णालयात घेतली होती त्यांना किं वा ज्यांना खासगी रुग्णालयात जायचे होते अशांना गेल्या काही दिवसांपासून काय करावे हे कळत नाही, अशी स्थिती आहे.

पालिके च्या केंद्रांना प्राधान्य

लससाठा मर्यादित येत असल्यामुळे पालिकेच्या केंद्रांना प्राधान्याने पुरवठा केला जात असल्याचे पालिका आरोग्य विभागाने स्पष्ट के ले. पालिकेच्या केंद्रांवर मोफत लस दिली जात असल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा व्हावा याकरिता हा निर्णय घेतला असून रविवारीही लसीकरण सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारच्या दिवसभरातील स्थिती

७८ केंद्रे सुरू

१८ केंदे लससाठा असेपर्यंतच सुरू

५४ केंद्रे  बंद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:03 am

Web Title: avoid vaccination centers stop vaccination akp 94
Next Stories
1 बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवासाची धडपड
2 प्राणवायूसाठी २४ तास पूर्वमागणी आवश्यक
3 वैद्यकीय तपासणीनंतरच रुग्णशय्या वितरण
Just Now!
X