22 October 2020

News Flash

मास्क परिधान करा, अन्यथा कारागृहाची शिक्षा?

प्रवाशाने पहिल्यांदा गुन्हा केला तर कलम १४५ अ‍ॅक्टनुसार २५० रुपये दंड ठोठावला जाईल.

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेकडून जनजागृती अभियान

मुंबई : मास्क परिधान करणे, शारीरिक अंतर न ठेवणे या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना थेट कारागृहाची हवा खावी लागणार आहे. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना के ले जात असून रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून पाच लाखांपेक्षा जास्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करतात; परंतु प्रवासादरम्यान प्रवासी मास्क परिधान न करणे, पादचारी पूल, फलाटावरून चालताना शारीरिक अंतर ठेवत नसल्याचे दिसते. लोकल प्रवासातही दरवाजा अडवला जातो. याविरोधात रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाईचा इशारा मध्य रेल्वेकडून दिला जात आहे.

प्रवाशाने पहिल्यांदा गुन्हा केला तर कलम १४५ अ‍ॅक्टनुसार २५० रुपये दंड ठोठावला जाईल. पुन्हा गुन्हा के ल्यास कलम १५४ नुसार एक वर्षापर्यंत कारागृहाची शिक्षा होऊ शकते, तर कलम १५३ नुसार पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी करोनाकाळात सहप्रवाशाला धोका उत्पन्न होईल अशा प्रकारचे वर्तन के ल्यास आणि त्याची तक्रार आल्यास किं वा प्रत्यक्षात निदर्शनास आल्यास त्या प्रवाशावर कारवाई के ली जाणार असल्याचे स्पष्ट के ले. सध्या उद्घोषणा करून किं वा प्रवाशांना प्रत्यक्षात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते याची माहिती दिली जात आहे. पुढील आठवड्यापासून किं वा त्यानंतर या कारवाईला रेल्वे पोलिसांकडून सुरुवातही होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 1:29 am

Web Title: awareness campaign from central railway mask dressed imprisonment akp 94
Next Stories
1 बालकांमध्ये स्वॅप मूत्रपिंड प्रत्यारोपण
2 विक्रोळी उपकेंद्रासाठी जागेचे तातडीने हस्तांतरण
3 अतिवृष्टीबाधितांना तातडीने मदत करा!
Just Now!
X