03 June 2020

News Flash

आझाद मैदानातून : खेळ मांडियेला..

आंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे.

आंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे.

आंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे. त्याही आधी या मदानात लष्करी कवायती व्हायच्या. त्यानंतर भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील या मदानावर क्रिकेटची गंगोत्री सुरू झाली. पण क्रिकेट सोडून इतरही अनेक खेळ या मदानाच्या आसऱ्याने खेळले जातात..

आझाद मदान म्हणजे क्रिकेट, ही ओळख अगदी जगभरात प्रसिद्ध आहे. मंत्रालय किंवा विधान भवनावर जाणारे मोच्रे अडवून ते या मदानात ‘जिरवण्या’ची परंपरा सुरू झाली, त्याच्या खूप आधीपासून आझाद मदानातील क्रिकेटचे चौरंगी किंवा पंचरंगी सामने प्रसिद्ध आहेत. पारशी, हिंदू, इस्लाम अशा जिमखान्यांमध्ये रंगणारे हे सामने एके काळी मुंबईतील अत्यंत नावाजलेला ‘इव्हेंट’ होता. हे सामने पाहण्यासाठी अगदी पुणे, नाशिक वगरे शहरांतून त्या काळी लोक आवर्जून हजेरी लावायचे. विजय हजारे, विनु मंकड, फारुक इंजिनीअर वगरे दिग्गज खेळाडू या चौरंगी सामन्यांमध्ये आपल्या फटक्यांची रांगोळी मांडायचे आणि त्या रांगोळीचे काही रंग आपल्याही अंगावर पडावेत, म्हणून अनेक बघे या मदानाच्या कुंपणाभोवती गर्दी करायचे.

त्याच्याही आधी आझाद मदान किंवा हे एस्प्लनेड मदान लष्कराच्या कवायतींसाठी प्रसिद्ध होतं. हा काळ म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनसची इमारत उभी राहण्याच्या आधीचा काळ! हळूहळू १८५७चं बंड थंड झालं आणि मुंबईत ब्रिटिशांचा अंमल स्थिरावला. मुंबईकरांना साहेब आवडू लागला, तसा या आझाद मदानावरील कवायती बंद झाल्या आणि क्रिकेट सुरू झालं.

ही क्रिकेटची परंपरा किती देदीप्यमान असावी? भारतात खेळवला गेलेला पहिला कसोटी क्रिकेट सामना याच मदानातील बॉम्बे जिमखान्यावर खेळवला गेला होता. मुंबईतील किंवा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाच्या अशा हॅरिस आणि गाइल्स शिल्डचे सामनेही याच मदानावर खेळवले जातात. १९८७ साली याच मदानाने दोन चिमुरडय़ा मुलांची विश्वविक्रमी भागीदारी बघितली होती. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची मॅरेथॉन भागीदारी त्या वेळी केली होती. गेल्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सामना खेळत त्यात शतक झळकावणाऱ्या नवोदित पृथ्वी शॉने याच मदानावर २०१३मध्ये ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. ही परंपरा पुढेही अशीच चालू राहणार आहे. आजमितीला आझाद मदानात मुंबईतील २२ क्रिकेट क्लब कार्यरत आहेत. यात एल्फिन्स्टन, फोर्ट विजय, ससानियन, बॅरोनेट अशा एकापेक्षा एक सरस क्रिकेट क्लबचा समावेश आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांसाठी आझाद मदानाचा मोठा भाग मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनने ताब्यात घेतला आहे. हा भाग एवढा आहे की, त्यात जवळपास १८ क्लबच्या खेळपट्टय़ांचा समावेश आहे. परिणामी या क्लबमधल्या खेळाडूंना आता आपल्या खेळाची चिंता भेडसावू लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या जागेच्या बदल्यात वांद्रे-कुर्ला संकुलात जागा मागितली आहे. ती मिळेलही, पण आझाद मदानासारख्या ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाणी आपल्या क्रिकेटची कारकीर्द घडवण्याची संधी या नवख्या खेळाडूंच्या हातून निसटणार आहे. या मदानाला चक्कर मारताना मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून मेट्रोच्या दिशेने चालताना सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या फाटकासमोरच एक छोटंसं द्वार आहे. हा दरवाजा मुंबई स्कूल्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या आवारात नेऊन सोडतो. मुंबईतील तब्बल ३९० शाळांचा सहभाग असलेली ही संस्था या शाळांमधील वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. यात क्रिकेटबरोबरच फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केट बॉल, बॅडिमटन, बॉिक्सग, जिम्नॅस्टिक, हॉकी, कबड्डी, खो-खो, टेनिस, स्क्व्ॉश, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ अशा अनेक खेळांचा समावेश आहे. या असोसिएशनचा इतिहासही मोठा रंजक आहे. मुंबईतील अनेक भव्य उपक्रमांमागे ज्या टाटा समूहाचा हात आहे, त्याच टाटा समूहाने या वास्तूची आणि संस्थेची पायाभरणी केली. जमशेटजी टाटा यांचे पुत्र सर दोराबजी टाटा यांनी १८९३मध्ये काही क्रीडा प्रेमींना एकत्र घेत टाटा अ‍ॅथलॅटिक शिल्ड सुरू केली. त्या वेळी या संस्थेचे नाव बॉम्बे हायस्कूल्स अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन असं होतं. कालांतराने त्यात बदल झाला आणि सध्या मुंबई स्कूल्स स्पोर्ट्स असोसिएशन या नावाने ही संस्था काम करत आहे.

मगाशी उल्लेख केलेल्या हॅरिस आणि गाइल्स शिल्ड या स्पर्धाही याच संस्थेद्वारे दर वर्षी घेतल्या जातात. पहिली हॅरिस शिल्ड १८९६ मध्ये खेळवली गेली. तर पहिली गाइल्स शिल्ड ११६ वर्षांपूर्वी म्हणजे १९०१मध्ये झाली. या दोन स्पर्धामध्ये खेळलेले आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले तब्बल ६० हून अधिक क्रिकेटपटू आजही हयात आहेत. टाटा शिल्ड फॉर इंटर स्कूल अ‍ॅथलेटिक्स मीट ही स्पर्धा तर १८९३पासून अव्याहत सुरू आहे. याच बरोबरीला १००हून अधिक वष्रे पूर्ण केलेली या संस्थेची आणखी एक स्पर्धा म्हणजे हॉकीसाठीची ज्युनिअर आगा खान स्पर्धा! ही स्पर्धादेखील १९०१मध्ये पहिल्यांदा खेळवली गेली होती. सध्या या संस्थेशी मुंबईतील ३९० पेक्षा जास्त शाळा जोडल्या गेल्या आहेत. तसंच या संस्थेतर्फे वर्षभर घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धामध्ये ८ ते १६ या वयोगटातील तब्बल ६० हजारांहून अधिक मुलं सहभाग घेतात. मुंबईत किंबहुना भारतातच क्रीडा संस्कृती आहे काय, हा मोठा प्रश्न असतो. पण ही संस्था मुंबईतील ६० हजार मुलांना दर वर्षी स्पध्रेत सहभागी करून घेते. शालेय जीवनातच एखाद्या खेळाची गोडी लावण्यासाठीचे हे एक मोठे पाऊल आहे. विज्ञानापासून कलेपर्यंत आणि शिक्षणापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रातच टाटा या नावाने दिलेल्या अमूल्य योगदानाची नवीन ओळख करून देत ही संस्था अजूनही दिमाखात काम करत आहे. यंदा या संस्थेला १२४ वष्रे पूर्ण होतील. १२४ वष्रे मुंबईला खेळाचे महत्त्व पटवून देणारी आणि मदानी खेळांपासून कॅरम-बुद्धिबळ यांसारख्या बठय़ा खेळांना एका छताखाली आणणारी ही संस्था म्हणजे आझाद मदानाच्या कोंदणात बसवलेला लखलखता हिराच आहे.

रोहन टिल्लू  @rohantillu

tohan.tillu@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2017 2:47 am

Web Title: azad maidan real home of cricket
Next Stories
1 विकासकामांच्या निधीला कात्री!
2 ग्राहक प्रबोधन : विद्यार्थीही ग्राहकच!
3 गुढीपाडव्यानिमित्त खरेदीला जोर!
Just Now!
X