गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी परिचित असलेले पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचं करोनामुळे आज निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. पटेल हे ‘सीआयडी’मध्ये कार्यरत असलेल्या आझम पटेल यांना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

पटेल हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यावेळी त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते. पटेल यांनी ७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटातही महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांनी तपासातून या हल्ल्याचं मोड्यूल समोर आणलं होतं. पटेल यांनी दक्षिण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. त्याचबरोबर एनआयए, सीआयडीमध्येही त्यांनी काम केलं होतं.

आझम पटेल हे २००१च्या बॅचचं अधिकारी होते. पटेल यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पटेल यांच्यासह आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील चार महिन्यांच्या काळात राज्यात १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे.