संदीप आचार्य

राज्यातील पाच लाख आदिवासी अर्भकांना वाटप

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

राज्याचे आरोग्य व सामाजिक स्थितीचे मोजमाप हे बालमृत्यू दरावरून ठरतात. हे बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच अर्भकमृत्यू रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाच लाख आदिवासी अर्भकांना ‘बेबी केअर किट’ देण्याची योजना हाती घेतली आहे. तमिळनाडू व तेलंगणापाठोपाठ अशा प्रकारे बेबी केअर किट देणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य आहे.

आरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभागाकडून बालकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातही महिला व बालविकास विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून शून्य ते सहा वयोगटाच्या बालकांना पोषण आहार देणे, त्याचे नियमित वजन घेऊन सॅम व मॅम वजनी गट निश्चित करून बालकांच्या आरोग्याची देखभाल करणे तसेच गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम हा विभाग करीत असतो. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाडी व १३ हजार मिनी अंगणवाडय़ा असून यात सुमारे ७३ बालकांना पोषण आहार व आरोग्याची तपासणी केली जाते. पूर्वशालेय शिक्षण देण्याची प्रमुख जबाबदारीही आहे. जी बालके ही एक वर्षांच्या आतील आहेत त्यांच्या आरोग्याची विशेष पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असून केवळ पोषण आहार मिळणे एवढय़ापुरते ते मर्यादित नाही. एक वर्षांच्या आतील बालकांच्या मृत्यूची बरीच कारणे असून यात आईचे बालसंगोपनाविषयी असलेले अपुरे ज्ञान, राहण्याच्या ठिकाणची परिस्थिती, स्वच्छ पाणी तसेच संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणे आणि लसीकरण करून रोगप्रतिबंधक शक्ती वाढविणे आवश्यक असते.

या पार्श्वभूमीवर तमिळनाडू व तेलंगणाच्या धर्तीवर नवजात बालकांना ‘बेबी केअर किट’ देण्याचा निर्णय खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. पहिल्या टप्प्यात केवळ आदिवासी जिल्ह्य़ांपुरताच हा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, केवळ पहिल्या बाळासाठीच ही योजना का, असा आक्षेप उपस्थित करण्यात येत आहे.

होणार काय?

राज्यात साधारणपणे दरवर्षी २० लाख बालकांचा जन्म होत असून त्यापैकी पाच लाख बालके ही आदिवासी भागात जन्माला येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘बेबी केअर किट’ घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी सांगितले.

देणार काय?

दिल्या जाणाऱ्या बेबी केअर किटमध्ये लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, लहान मुलांना झोपण्याची गादी, टॉवेल, इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, लहान मुलांना अंगाला लावायचे अडीचशे मिलिलिटर तेल, मच्छरदाणी, लहान मुलांसाठी गरम ब्लँकेट, प्लास्टिक ची चटई, शॉम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे व पायमोजे व हे सर्व सामान ठेवण्यासाठी एक बॅग देण्यात येणार आहे. या एका किटची किंमत सुमारे दोन हजार रुपये असून यासाठी पाच कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यात तरतूद करण्यात आली आहे.

रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तसेच अंगणवाडीत नवव्या महिन्यात ज्यांची नोंदणी झाली अशा प्रत्येक आदिवासी मातेला हा बेबी केअर किट उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाळाच्या जन्मापूर्वीच हा किट देण्यात येणार असून जेथे असे शक्य नसेल तेथे अर्ज मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत हा किट दिला जाईल.

– विनिता सिंघल, प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग