News Flash

पालिकेच्या उपअभियंत्याला अटकपूर्व जामीन मंजूर

मॅनहोलमध्ये ट्रक अडकून झालेल्या अपघाताचे प्रकरण

संग्रहित छायाचित्र

मॅनहोलमध्ये ट्रक अडकून झालेल्या अपघाताचे प्रकरण

मुंबई : विक्रोळीच्या पार्कसाइट येथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मॅनहोलमध्ये ट्रकचे चाक अडकून तो उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेच्या उपअभियंत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आशीष आमरे असे या उपअभियंत्याचे नाव आहे. घटनेनंतर दहा महिन्यांनी त्यांना प्रकरणात आरोपी दाखवण्यात आल्याने त्यांच्या कोठडी चौकशीची आवश्यकता वाटत नाही, असे नमूद करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आमरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी एप्रिल २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु फेब्रुवारी २०२० पर्यंत तपास यंत्रणेने आमरे यांचा प्रकरणात आरोपी म्हणून समावेशच केला नव्हता. जर आता त्यांना अटक करण्यात आली, तर अटकेमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाशिवाय त्यांना नोकरीही गमवावी लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले.

विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरात १८ एप्रिल २०१९ रोजी धान्याने भरलेल्या ट्रकचे चाक मॅनहोलमध्ये अडकले. ट्रकचा चालक चाक काढण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक उलटला आणि त्याखाली पाच जण चिरडले गेले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मॅनहोलच्या झाकणाभोवती नव्याने करण्यात आलेले क्राँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे त्याची वजन पेलण्याची क्षमता कमी होती. परिणामी अपघात झाल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:06 am

Web Title: bail granted to deputy engineer of mumbai municipal corporation zws 70
Next Stories
1 अग्निशमन दलावर ताण
2 उद्वाहनाच्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू
3 पर्यटन कंपन्यांकडून ‘वर्केशन’ पॅकेज
Just Now!
X