23 September 2020

News Flash

रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला

रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता.

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.

रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी चक्रवर्ती भावंडांची आणि पोलिसांची बाजू ऐकल्यावर सुनावणी शुक्रवारी ठेवली. या वेळी प्रकरणात अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामिनावरही सुनावणी झाली. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण केली.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली.  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:40 pm

Web Title: bail pleas of showik chakraborty and rhea chakraborty rejected by a special court in mumbai ssv 92
Next Stories
1 कंगनाची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार? तपासासाठी ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र
2 धक्कादायक, मुंबईतल्या ५० टक्के बांधकामांना OC नाही
3 ‘तोडलेल्या ऑफिसमधूनच काम करणार’; कंगनाचा निर्धार
Just Now!
X