23 January 2020

News Flash

शिवसेनाप्रमुखांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी

पालिका सभागृहाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या बैठकीत ही ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेची नवी मागणी; पालिका सभागृहात ठराव मांडणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतून होऊ लागली आहे. राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी पालिका सभागृहात ठराव मांडण्याची तयारी शिवसेना नगरसेवकाने सुरू केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ४६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते घडविले. विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल आदर आहे. निवडणूक न लढविता त्यांनी राजकारणावर अधिराज्य गाजविले. राज्य सरकारने राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत नोव्हेंबर २०१५ रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. परिपत्रकातील यादीत ठाकरे यांच्या नावाचा समावेश करावा आणि शासन पातळीवर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी, अशी मागणी नगरसेवक किरण लांडगे यांनी केली आहे.

भावी पिढीला बाळासाहेब ठाकरे यांची महती कळावी यासाठी शासकीय पातळीवर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याच्या यादीत सुधारणा करावी आणि शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यात समाविष्ट करावे, अशा आशयाच्या ठरावाची सूचना  लांडगे यांनी पालिका सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका सभागृहाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या बैठकीत ही ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे.

First Published on July 20, 2019 12:55 am

Web Title: balasaheb thackeray birth anniversary death anniversary celebrate government level abn 97
Next Stories
1 डोंगरी दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
2 मुंबई उपनगरी मार्गावर २९ प्रवाशांचे अपघात ; गुरुवारी १६ जणांचा मृत्यू
3 खूशखबर ! मुंबईतील पाणीकपात रद्द
Just Now!
X