14 December 2017

News Flash

अन्त्यदर्शनाला राजकीय, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

शिवतीर्थावर बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंत्यदर्शन घेताना

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 19, 2012 2:14 AM

शिवतीर्थावर बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंत्यदर्शन घेताना अनेकांना भावनावेग आवरता आला नाही.  शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव शिवाजी पार्क परिसरात आणले जात असतानाच राजकारण, चित्रपट, उद्योग जगतामधील अनेक मान्यवरांनी तेथे उपस्थित राहून आपल्या लाडक्या मित्राचे अखेरचे दर्शन घेतले.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरूण जेटली, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी ठाकरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना अभिवादन केले.
अमिताभ बच्चन, गोपीनाथ मुंडे, मनेका गांधी, सुप्रिया सुळे, स्मृती इराणी, शहानवाझ हुसेन, प्रवीण तोगडिया, तसेच छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, वर्षां गायकवाड, लक्ष्मण ढोबळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, नसीम खान, राधाकृष्ण विखे पाटील, सतेज पाटील, एकनाथ खडसे, विनोद तावडे, खा. संजय पाटील, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, संजय निरूपम, समीर भुजबळ, राजीव शुक्ला आदी उपस्थित होते.
उद्योजक सुभाषचंद्र गोयल, वेणुगोपाल धूत, अनिल अंबानी, चित्रपट अभिनेता नाना पाटेकर, संजय दत्त, महेश मांजरेकर, मधुर भांडारकर, चंद्रकांत देसाई, रितेश देशमुख आदी कलाकारही उपस्थित होते.    बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घेताना यातील सर्वाच्याच भावनांचा बांध फुटला.

First Published on November 19, 2012 2:14 am

Web Title: balasaheb thackeray funeral a stream of eminent personalities from politics films and corporate world reached the historic shivaji park