20 September 2020

News Flash

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार

संग्रहीत छायाचित्र

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळानं घेतला आहे. या विमा योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं  आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना असून, चार वर्षांनी अखरे या या योजनेस मंजुरी मिळाली आहे.

अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेत ७४ पॅकेज असतील. तसेच, राज्यातील अनेक रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णलयाच्या वास्तव्यातील भोजनाचा समावेश असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 8:31 pm

Web Title: balasaheb thackeray road accident insurance scheme approved msr 87
Next Stories
1 आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
2 “कंगनाने हिमाचल प्रदेशमधून ड्रग्सविरोधातील लढा सुरू करावा”; उर्मिला मातोंडकरांचा सल्ला
3 बहुमजली इमारतींत करोनाचा घरोबा
Just Now!
X