‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’च्या विजेत्यांचा सन्मान

मुंबई छ विक्रोळी येथील ‘बालमित्र कला मंडळ’ यंदाच्या ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’तील ‘मुंबईचा राजा’ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. दादरच्या यशवंत नाटय़ मंदिर येथे गुरुवारी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

‘बालमित्र कला मंडळा’ला ५१,००१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊ न गौरविण्यात आले. तसेच ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘रिजन्सी ग्रुप’तर्फे पर्यावरणस्नेही मंडळाला देण्यात येणारे विशेष पारितोषिक भांडुप पश्चिम येथील ‘विकास मंडळ साई विहार गणेशोत्सव’ या मंडळाने पटकावले. त्यांना १५,००१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊ न गौरविण्यात आले.

‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’तर्फे  चकाला, अंधेरी (पू.) येथील ‘श्री गणेश क्रीडा मंडळा’चे सतीश गिरकर यांना पर्यावरणस्नेही मूर्तिकार म्हणून सन्मानित करण्यात आले. गिरकर यांना २५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘अभ्युदय को-ऑ. बँक लिमिटेड’ आहे. स्पर्धा ‘इंडियन ऑइल’तर्फे  पॉवर्ड बाय आहे. तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या स्पर्धेचे ‘इको फ्रेंडली’ पार्टनर आहेत.

सर्वोत्कृष्ट मूर्तिकार (रुपये २५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

* कुलाबा ते अंधेरी – विशाल रांजणकर, श्री बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ (विलेपार्लेचा विश्वविनायक), विलेपार्ले

* जोगेश्वरी ते दहिसर – दिगंबर मयेकर, नवशक्ती मित्रमंडळ, बोरिवली (प.)

* सीएसटी ते मुलुंड – संदीप गजकोष, बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (प.)

* ठाणे शहर – संजय यादव, शिवसम्राट मित्रमंडळ, ठाणे

* डोंबिवली-कल्याण – अतुल खामकर, सार्वजनिक सेवा विचार मंडळ, कल्याण (प.)

* नवी मुंबई विभाग – प्रतीक पवार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४ ते ५ (वाशीचा विघ्नहर्ता), वाशी.

 

सर्वोत्कृष्ट संहितालेखन (रुपये २५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

* कुलाबा ते अंधेरी – सचिन शेट्टी, रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ

* जोगेश्वरी ते दहिसर – अविनाश मोरे, विघ्नहर्ता रहिवासी मित्रमंडळ, बोरिवली (पू.)

* सीएसटी ते मुलुंड – संचित वर्तक व मीलन इंदुरकर, गं. द. आंबेकर मार्ग (कोळेवाडी), सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी

* ठाणे शहर – थॉमस डिसूझा, ओम शक्ती विनायक मित्रमंडळ, ठाणे (पू.)

* डोंबिवली – कल्याण – विजय साळवी, विजय तरुण मंडळ, कल्याण (प.)

* नवी मुंबई विभाग – किशोर पाटील, लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ

 

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (रुपये २५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

* कुलाबा ते अंधेरी – दिगंबर मयेकर, बाळगोपाळ मित्रमंडळ (मुंबईचा पेशवा), विलेपार्ले

* जोगेश्वरी ते दहिसर – मंडळाचे कार्यकर्ते, गोकुळनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर (पू.)

* सीएसटी ते मुलुंड – प्रदीप पंडित, पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (राणीबागचा राजा)

* ठाणे शहर – भालचंद्र देसाई व शरद पवार, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळ, ठाणे (प.)

* डोंबिवली – कल्याण – अमित ठोसर व आमोद चिटणीस, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पू.)

* नवी मुंबई विभाग – डॉ. पूनम हुद्दार, सीवूड्स रेसिडेण्ट्स वेल्फेअर असोसिएशन, सीवूड्स

विभागवार प्रथम पारितोषिक (रुपये १५००० रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

* कुलाबा ते अंधेरी – स्वप्नाक्षय मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, मॉडेल टाऊन, अंधेरी

* जोगेश्वरी ते दहिसर – नवतरुण मित्रमंडळ, दहिसर (पू.)

* सीएसटी ते मुलुंड – बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (प)

* ठाणे शहर – जय भवानी मित्रमंडळ, गोकुळनगर, ठाणे (प)

* डोंबिवली – कल्याण – शिवनेरी मित्रमंडळ, डोंबिवली (पू.)

* नवी मुंबई विभाग – शिवछाया मित्रमंडळ, तुर्भे

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे‘च्या पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा गुरुवारी यशवंत नाटय़ मंदिर येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. ‘मुंबईचा राजा’कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळ ‘मुंबईचा राजा’ पुरस्काराने सन्मानित होताच प्रेक्षागृहात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर व टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, अभ्युदय को. ऑप. बँकेचे मधुसूदन राजपुरकर आणि एलआयसी ऑफ इंडियाचे शिरीष शुक्ल उपस्थित होते. मुंबईतील अनेक मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी ‘जीवनगाणी’ निर्मित ‘तुज मागतो मी आता..’ हा कार्यक्रम सादर झाला. मान्यवर गायक आणि कलावंतांनी कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढविली. ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर आणि गायिका वैशाली सामंत यांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणात प्रेक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. उत्साह आणि आनंदाने बहरलेल्या या सोहळ्याचे निवेदन मृण्मयी भजक आणि कुणाल रेगे यांनी केले.

वाचकांची पसंती

(मानचिन्ह व सन्मानपत्र)

शिवतेज मित्रमंडळ, सानपाडा

प्रायोजक : ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘अभ्युदय को-ऑप. बँक लिमिटेड’ आहेत. तर स्पर्धा इंडियन ऑइलतर्फे  ‘पॉवर्ड बाय’ आहे. तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या स्पर्धेचे ‘इको फ्रेंडली’ पार्टनर आहेत.