26 February 2021

News Flash

वांद्र्यातील झोपडपट्टीत भीषण आग, ५० झोपड्या खाक

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मंगळवारी सकाळी नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली.

वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या.

मंगळवारी सकाळी नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अद्याप आगीत जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी पोहोचले असून अरुंद रस्त्यांमुळे अडथळे येत आहेत.

दरम्यान, वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 11:45 am

Web Title: bandra fire broke out at garib nagar slum fire tender on spot
Next Stories
1 संपात सहभागी न झालेल्या ओला चालकाला बेदम मारहाण आणि उठाबशांची शिक्षा 
2 महिलांना आखाती देशात वेश्याव्यवसायात ढकलणारे त्रिकुट अटकेत
3 मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन
Just Now!
X