तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिन्यांवर १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे काम शनिवार २१ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तीन दिवसांच्या कालावधीतील पाणीपुरवठय़ाचा तपशील पुढीलप्रमाणे
गुरुवार, १९ नोव्हेंबर- संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व)-नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल.
वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहत- सकाळी ११ नंतर पाणीपुरवठा नाही.
एअरपोर्ट हॅंगर, इंडियन एअर लाइन्स वसाहत-सकाळी ११ नंतर पाणीपुरवठा नाही
शुक्रवार, २० नोव्हेंबर- संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व), वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहत, एअरपोर्ट हॅंगर, इंडियन एअर लाईन्स वसाहत- पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
शनिवार, २१ नोव्हेंबर- संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व)-नेहमीच्या वेळेवर किंवा काम पूर्ण न झाल्यास उशिराने पाणीपुरवठा होईल.
वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहत-नेहमीच्या वेळेवर किंवा काम पूर्ण न झाल्यास उशिराने पाणीपुरवठा होईल.
एअरपोर्ट हॅंगर, इंडियन एअर लाइन्स वसाहत-दुपारी एक वाजल्यानंतर पाणीपुरवठा करण्यात येईल. वरील कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.