साम्यवादी विचारवंत आणि वेदांचे अभ्यासक बानी देशपांडे यांचे फुफ्फुसातीस संसर्गामुळे शुक्रवारी सकाळी धन्वंतरी इस्पितळात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी खासदार रोझा देशपांडे, एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. साम्यवादी चळवळीचे भीष्माचार्य कॉ. डांगे यांचे ते जावई होत. बानी देशपांडे यांनी स्वातंत्र्य चळवळीत तसेच साम्यवादी चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. ‘युनिव्हर्स ऑफ वेदांत’, ‘मार्क्‍सवादी दर्शनची वैदिक परंपरा’, ‘कम्युनिस्ट मूव्हमेन्ट अ‍ॅण्ड इंडियन नॅशनल काँग्रेस’ ही पुस्तके त्यांनी लिहिली होती.