News Flash

भुजबळ आहात तिथेच रहा म्हणत शिवसेनेची बॅनरबाजी

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या आल्यानंतर शिवसैनिकांनी ही बॅनर्स उभारली आहेत

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आहेत तिथेच रहावं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही. या आशयाचे बॅनर लावत शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख करण्यात आला आहे. मी शिवसेनेत जाणार नाही हे छगन भुजबळ यांनी गुरुवारीच स्पष्ट केले आहे. मात्र त्यांना विरोध दर्शवणारी बॅनर्स मुंबईत झळकली आहेत.

छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे

काय म्हटले आहे बॅनरमध्ये?

केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा असा मजकूर लिहून रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांचा निषेध नोंदवला आहे. हा मजकूर असलेले हे बॅनर मातोश्रीच्या समोर, शिवसेना भवनाच्या समोर आणि मुंबईतल्या प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे असे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांचे कौतुकही त्यांनी केले. सचिन अहिर शिवसेनेत जाणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासूनच रंगल्या होत्या. त्याचसोबत छगन भुजबळ यांचीही शिवसेनेत घरवापसी होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र स्वतः छगन भुजबळ यांनी या चर्चांना काल पूर्णविराम दिला. असं असलं तरीही शिवसैनिकांनी या बातम्यांचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत छगन भुजबळ यांना प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे. भुजबळ यांचा निषेध नोंदवत बॅनरही झळकवली आहेत. छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणांमधून करत असत. तसाच त्यांचा लखोबा हा उल्लेख या बॅनरवरही करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 7:44 am

Web Title: banners against chhagan bhujbal by shiv sena in mumbai scj 81
Next Stories
1 विरार लोकलमधील चोराची अशीही माणुसकी !
2 तिन्ही डॉक्टरच पायलच्या आत्महत्येस जबाबदार!
3 परवडणाऱ्या घरांच्या सुविधांचा अर्थभार रहिवाशांवरच!
Just Now!
X