News Flash

बारबालेचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर नैसर्गिक

बोरीवली येथील एलोरा बारमधील कारवाईदरम्यान झालेला बारबालेचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

| September 2, 2013 03:40 am

बोरीवली येथील एलोरा बारमधील कारवाईदरम्यान झालेला बारबालेचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही चित्रिकरणात तिला मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान तिच्या मृतदेहावर जेजे रुग्णालयात तीन डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले.
  बोरीवली पुर्वेच्या एलोरा बार मध्ये शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा घातला होता. या छाप्याच्या वेळी एका २७ वर्षीय बारबालेचा अचानक मृत्यू झाला होता. पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप बारमालक आणि नातेवाईकांनी केला होता. पोलिसांनी हे आरोप फेटाळले. पोलिसांनी हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी पोलीस आत शिरले आणि दोन मिनिटांनीच ती बारबाला बेशुद्ध पडल्याने तिला खाली आणण्यात आल्याचे सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे मारहाणीचा प्रश्नच नाही असेही ते म्हणाले.
हॉटेलमधील सर्व २८ बारबाला आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून त्यांनीही या मारहाण झाली नसल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही बारमालकाचेच असल्याने त्यात फेरफार होऊच शकत नाही याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले. मयत तरुणीला यापूर्वी आजार होता. तिच्यावर उपचारही सुरू होते, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान,  बेकायदेशीर बारवर आमची कारवाई नियमित सुरू असते. नातेवाईकांचे आरोप बिनबुडाचे आहेत पण झालेला प्रकार दुर्देवी असल्याचे समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 3:40 am

Web Title: bar attendant woman died of natural death not by police trash
Next Stories
1 दाभोलकरांच्या विचारांचे आचरण हवे-पुष्पा भावे
2 धमकावल्याप्रकरणी ‘सफायर कॅपिटल’च्या मालकास अटक
3 क्रेन उलटल्याने दोन कामगार जखमी
Just Now!
X