News Flash

मुंबई – माटुंग्यात रस्त्यात बसने अचानक घेतला पेट

बसने पेट घेताच बसमधील प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत बेस्ट बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानाजवळ या बसने पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नसून सर्वजण सुरक्षित आहे. बसने पेट घेताच बसमधील प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

वरळी बस आगाराची २७ क्रमांकाची ही बस मुलुंडहून वरळीला जात होती. दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास बस माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानाजवळ पोहोचली असताना चालकाला केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येत असल्याचं लक्षात आलं. यानंतर काही वेळातच आग लागली. चालकाने तात्काळ बस बाजूला घेतली आणि बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं. बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. पण तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 5:43 pm

Web Title: best bus caught fire in matunga sgy 87
Next Stories
1 पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिला – चित्रा वाघ
2 धाक दाखवून भाजपात प्रवेश दिले नाहीत-मुख्यमंत्री
3 काळाचा घाला! वाढदिवशीच मुंबईतील तरुणीचा बुडून मृत्यू
Just Now!
X