News Flash

बेस्ट वाहक ६५ दिवसानंतर करोनामुक्त

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

मुंबई : बेस्टमधील वाहक विवेक गावडे  ६५ दिवसांनी करोनामुक्त झाले आहेत.  त्यांच्यावर के ईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

५२ वर्षांचे गावडे पत्नी व २० वर्षीय मुलासह नालासोपाऱ्याला राहतात. ते गेली २९ वर्षे बेस्टमध्ये कार्यरत आहेत. टाळेबंदीत कर्तव्यावर असताना त्यांना करोनाची लागण झाली. त्यांनी अनेक खासगी रुग्णालयात उपचारासाठी धावाधाव के ली. परंतु खाटा उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार मिळू शकले नाहीत. २० जूनला गावडे के ईएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यातच करोनाची लागण झाली.   प्रकृती गंभीर बनल्याने गावडे यांना आठ दिवस कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा के ल्यानंतर हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि त्यातून ते बाहेर पडले. करोनातून कशाही परिस्थितीत बाहेर पडायचे, त्यावर मात करायची असा निश्चयच के ला होता. त्यात डॉक्टरांची मोठी साथ मिळाली, असेही गावडे म्हणाले. ६५ दिवसांनंतर पत्नी व मुलाला भेटलो आणि मन भरून आल्याचे सांगितले.

दरम्यान, मजास आगारात काम करणारे दिलीप पैकु डे (५५) हेही  ६० दिवसानंतर करोनामुक्त झाले आहेत.  २७ जूनला ते प्रथम मुलुंड येथील अग्रवाल करोना सेंटरमध्ये दाखल झाले होते, परंतु प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल के ले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:07 am

Web Title: best bus conductor recovered from coronavirus after 65 days zws 70
Next Stories
1 पालिकेच्या उपअभियंत्याला अटकपूर्व जामीन मंजूर
2 अग्निशमन दलावर ताण
3 उद्वाहनाच्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू
Just Now!
X