News Flash

आसन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले.

मुंबईत ‘बेस्ट’ची पूर्ण प्रवासी क्षमतेने वाहतूक; रेल्वेसेवा नसल्याने प्रवाशांच्या बसथांब्यांवर रांगा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पन्नास टक्के  प्रवासी क्षमतेची अट असल्यामुळे अडचणींमुळे बेस्ट प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. सोमवारपासून निर्बंध शिथिल झाले आणि बेस्ट उपक्र मालाही पूर्ण प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी मिळाली. परंतु तरीही बेस्टच्या थांब्यावर प्रवाशांच्या रांगा कायम होत्या. उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने अनेकजण बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र होते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले. यात बेस्ट बसमधून ५० टक्के  आसन क्षमतेने वाहतूक करण्याची मुभा दिली. त्यामुळे एका आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने प्रवासी न घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. गेल्या वर्षापासून बेस्टच्या सेवेसाठी असलेल्या एसटीच्या एक हजार गाड्यांची संख्या २५० पर्यंत नेण्यात आल्या, तर सर्वसामान्यांनाही लोकल नसल्याने बेस्टवरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे बस स्थानकांवर प्रचंड गर्दी होऊ लागली. परंतु ५० टक्के  आसनक्षमतेमुळे अनेक प्रवाशांना प्रवेशच मिळत नव्हता. गर्दीच्या वेळी वाहकाशी किं वा थांब्यावर उपस्थित बेस्ट अधिकाऱ्यांशी वाद घालून प्रवासी नाईलाजाने बसमध्ये प्रवेश करु लागले. त्यामुळे चालक, वाहकही हतबल झाले. परंतु सोमवारपासून १०० टक्के  आसनक्षमतेनुसार बसगाड्या चालवण्यात आल्या आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. यात सर्व आसनांवर प्रत्येकी दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली. तर उभ्याने प्रवासाची परवानगी नाकारली.

सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाल्याने सोमवारी सकाळी व सायंकाळी बस थांब्यावर गर्दी होती. बस येताच मधल्या थांब्यामधून पकडणारे प्रवाशांची मोठी पंचाईत झाली. काही मार्गांवर बस आधीच भरून येत होत्या. त्यामुळे थांब्यावर आलेल्या बसमध्ये प्रवेश करताच प्रवासी पुन्हा उतरत होते. उभ्याने प्रवासाची मुभा नसल्याने थाब्यांवर ताटकळ असलेले प्रवासी बसमध्ये प्रवेश के ल्यानंतर रिकामी जागा पाहताच ती पकडण्यासाठी धडपडत होते. त्यात धक्काबुकीही झाली.

अनेक ठिकाणी गर्दी

बसमधील दरवाजातून प्रवेश करतानाही प्रवासी एकच गर्दी करत होते. ठाण्यातील तीन हात नाका, कॅ डबरी जक्शन, आनंद नगर, कोपरी, मुलुंड मिठागर, कांजुरमार्ग व्हिलेज, भांडुप पंपिंग स्टेशन बस थांबा, सायन गांधी मार्के ट, सायन रेल्व स्टेशन, कु र्ला रेल्वे स्टेशन, वांद्रे स्थानक यासह दक्षिण मुंबई, पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक थांब्यांवर हेच चित्र होते. सायंकाळीही गर्दीच्या वेळी हीच परिस्थिती होती. महत्वाची बाब म्हणजे उभ्याने प्रवासाची मुभा नसल्याने चालक आणि वाहक प्रवाशांची समजूत काढतानाच त्यांना नियमावली सांगून बसमधून उतरवतही होते. थांब्यांवर आधीच उभे असलेले वाहकही प्रवाशांना नियमावलीची आठवण करून देत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:03 am

Web Title: best bus local train sit catching public akp 94
Next Stories
1 खवय्यांची उपाहारगृहांकडे धाव
2 ‘पार्ले टिळक’च्या सन्मानार्थ टपाल पाकीट
3 मध्य रेल्वे मार्गावर १५ नाल्यांची सफाई
Just Now!
X