News Flash

‘बेस्ट’च्या ताफ्यात आणखी ३०० विद्युत एसी बस

बेस्ट उपक्रम केंद्र सरकारच्या फेम योजना टप्पा-२ अंर्तगत विजेवरील बसगाडय़ा दाखल करत आहेत.

‘बेस्ट’च्या ताफ्यात आणखी ३०० विद्युत एसी बस
(संग्रहित छायाचित्र)

 

बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई  : सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवासासोबत इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील आणखी ३०० विजेवरील वातानुकूलित बसगाडय़ा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला बुधवारी बेस्ट समितीने मंजुरी दिली. मार्च २०२० नंतरच या बसगाडय़ा टप्प्याटप्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

बेस्ट उपक्रम केंद्र सरकारच्या फेम योजना टप्पा-२ अंर्तगत विजेवरील बसगाडय़ा दाखल करत आहेत. सध्या विजेवर धावणाऱ्या ३० बसगाडय़ा आहेत. येत्या काही महिन्यात त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर चर्चा करताना भाजप सदस्य सुनिल गणाचार्य यांनी आधीच्या विजेवरील बसगाडय़ांची कामगिरी कशी आहे त्या आधारवरच बसगाडय़ा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. भाडेतत्त्वावरील या बसगाडय़ांसाठी १,२०० कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी मुंबई पालिकेकडून निधी घ्यावा,अशी देखिल सूचना केली. शिवसेनेचे आशीष चेंबूरकर यांनी भाडेतत्त्वावरील या बसगाडय़ांना येण्यासाठी मुदत असलीच पाहिजे. सध्या बेस्ट उपक्रमात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा धीम्या गतीने येत असून ते पाहता विजेवरील बसगाडय़ांसाठीही कालावधी देण्याची मागणी केली. तर कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यासाठी लागणाऱ्या      मनुष्यबळाचे नियोजन व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल असे सांगून विजेवरील ३०० बसगाडय़ांचा प्रस्ताव मंजूर करत असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले.

विजेवरील बसगाडय़ांमध्ये १४० एकमजली वातानुकूलित आणि  १६० मिडी वातानुकूलित बसचा समावेश आहे. एकमजली बसगाडय़ांची प्रत्येकी किंमत दोन कोटी आणि मिडी बसची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. ६० दिवसांमध्ये प्रोटो टाईप बसगाडी दाखल होईल. चाचणीनंतर चार महिन्यांमध्ये २५ टक्के बसगाडय़ा पुरवठा होईल. त्यानंतर सात महिन्यांमध्ये ५० टक्के आणि पुढील दहा महिन्यात २५ टक्के वीजेवरील बसगाडय़ा येतील.

दहा वर्षांचा करार

३०० बसगाडय़ा दाखल होण्याआधी फेम वन योजना टप्पा एक अंतर्गत विजेवरील ४० बसगाडय़ा सेवेत येणार होत्या. मात्र कंत्राटदाराने काढता पाय घेतल्याने या बसगाडय़ा येण्यास रखडल्या. त्यामुळे पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागत असून अवजड उद्योग विभागाकडून मंजुरीची गरज आहे. त्या आधी ३०० बसगाडय़ा दाखल करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. या बसगाडय़ा दहा वर्षांच्या करारावर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 1:18 am

Web Title: best bus three hundred electric ac bus akp 94
Next Stories
1 कंत्राटी वाहक प्रस्ताव लांबणीवर
2 १०० ताटांसाठी शेकडोंची गर्दी!
3 हवेत लोंबकळणाऱ्या वाहिन्यांपासून मुक्ती
Just Now!
X