01 October 2020

News Flash

प्रवाशांना दिलासा, बेस्टची मात्र ‘परीक्षा’!

१ जुलैपूर्वीचा बेस्टचा मासिक पास २४, तर त्रमासिक पास ७२ दिवसांच्या तिकिटांवर आकारला जात होता.

आजपासून पासच्या भाडय़ात सवलत

प्रवासी संख्येत होणाऱ्या घसरणीमुळे रोजच्या अर्थार्जनाचे मार्ग जवळजवळ बंद झाल्याने १ जुलैपासून बेस्टने नवीन भाडे टप्प्यात सुसूत्रीकरण आणि पासाच्या भाडय़ात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी बेस्टला मात्र यामुळे लाखो रुपयांचा भरुदड पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी स्वस्त प्रवासाचे मार्ग शोधले असताना बेस्टला रोज ५५५ अतिरिक्त बस पासांची विक्री करावी लागणार आहे. यात बेस्ट प्रशासनाला अपयश आल्यास उपक्रमाला सुमारे ४ लाख ५२ हजारांचा भरुदड पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

१ जुलैपूर्वीचा बेस्टचा मासिक पास २४, तर त्रमासिक पास ७२ दिवसांच्या तिकिटांवर आकारला जात होता. मात्र आज, शुक्रवारपासून नव्या निर्णयानुसार प्रवासी प्रतिसाद वाढण्यासाठी मासिक पास २२, तर त्रमासिक पास ६६ दिवसांवर आकारण्यात येणार आहे. त्यानुसार कालपर्यंत २ किलोमीटर अंतरासाठी आकारण्यात येणाऱ्या मासिक पासचे मूल्य ३९० रुपयांहून ३६० रुपये, तर त्रमासिक पास ४८० रुपयांहून ४४० रुपये आकारण्यात येणार आहेत. सुमारे २० कि.मी. अंतरापर्यंतच्या बस पासाचे पुन:मूल्यांकन करण्यात येणार आहे. मात्र, यात बेस्ट प्रशासनाला प्रतिदिन सरासरी ५५५ अधिक पासची विक्री करावी लागणार असल्याने आज शुक्रवारपासून बेस्टची परीक्षा सुरू झाली आहे.तसेच सर्वसाधारण, मर्यादित आणि जलद बस गाडय़ांच्या सेवांसाठी ८, १२, १७ आणि २० कि.मी. अतिरिक्त भाडे टप्पे सुरू करताना बेस्टला प्रतिदिनी २२ हजार ३३५ प्रवाशांची आवश्यता लागणार आहे, कारण प्रवास भाडय़ात सवलत देताना उपक्रमाच्या उत्पन्नात प्रतिदिन सरासरी ४ लाख ६१ हजार रुपयांची घट होत असल्याने बेस्टला प्रवाशांना आर्जव घालण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. येत्या काळ्यात  ‘बेस्ट’ वाहतूक वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशांनी बेस्ट बस गाडीने प्रवास करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.
chart

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 4:54 am

Web Title: best bus ticket fare cheap
Next Stories
1 राखीव भूखंडाचा पालिकेला विसर?
2 गुन्हेगारी जगतातील ‘रावणा’कडून पिल्लेचा श्री गणेशा.. 
3 अंधेरीतील औषधाचे दुकान खाक
Just Now!
X