प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी नवा प्रस्ताव

मुंबई : प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. मात्र तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश करारात आहेत. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील. शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा होईल आणि मंजुरीनंतरच नवीन भाडे लागू होणार आहे.

 

बस    सध्याचे भाडे       प्रस्तावित भाडे

साधी    ८ रु.                      ५ रु.

(२ कि.मी.)              (५ कि.मी.)

एसी     १५ रु.                       ६ रु.

(२ किमी)                    (५ किमी)