|| सुशांत मोरे

बेस्टचा नवीन बस खरेदीचा निर्णय प्रलंबित

मुंबई : लोकल बंद असताना मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा भार एकहाती पेलणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील ८९८ जुन्या गाड्या येत्या मार्चपर्यंत भंगारात निघणार असताना नवीन गाड्या खरेदीचा काहीच निर्णय न झाल्याने भविष्यात बेस्टचा ताफा आक्र सून सामान्य प्रवाशांच्या हालात भर पडणार आहे.

सध्या बेस्ट प्रवाशांची संख्या १६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या प्रवाशांकरिता टाळेबंदीत अनेक अडचणींना तोंड देत बेस्ट आपल्या ताफ्यातील ३,५०० पैकी ३,२०० ते ३,४५० गाड्या दररोज रस्त्यावर उतरवत आहे. यातील अनेक गाड्यांचे आयुुर्मान संपत आल्याने त्या वारंवार बिघडतात. काही तर चालविताही येत नाहीत. त्यात बेस्टकडील स्वमालकीच्या ३,५०० पैकी ८९८ बसचे आयुर्मान संपत असून त्या मार्च २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्यात भंगारात काढल्या जाणार आहेत. मात्र निधीअभावी या गाड्यांच्या जागी नव्या बसगाड्या खरेदी करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भाडेतत्त्वावरील १,२०० पैकी काही गाड्यांचे आगमनही निरनिराळ्या कारणावरून लांबले आहे.

जुन्या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय टाळेबंदीआधीच झाला होता. आता ही प्रक्रि या सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

या जुन्या गाड्यांच्या नव्या बस सेवेत आणणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत बेस्टने काहीच निर्णय घेतलेला नाही. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांना विचारले असता, नवीन बस खरेदीच्या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पण दुसरीकडे  टाळेबंदीत बेस्ट समितीची बैठकही झालेली नाही. नवीन गाड्या सेवेत आणण्याचे धोरण नसेल तर किमान भाडेतत्त्वावरील गाड्या वाढविणे आवश्यक आहे. पण त्याबाबतही बेस्टची चालढकल सुरू आहे.

दुमजली बसही भंगारात

भंगारात जाणाऱ्या ८९८ बसमध्ये ३० ते ४० दुमजली आहेत. सध्या बेस्टकडे १२० दुमजली बस असून ७० बसच सेवेत आहेत. ऊर्वरित बसचे आयुर्मान संपत आल्याने चालविता येत नसल्याचे सांगितले जाते.

भाडेतत्त्वावरील बसगाड्याही अपुऱ्याच

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील १,२२७ मिनी वातानुकू लित बसपैकी ४६२ बस दाखल झाल्या आहेत. ऊर्वरित ७६५ मिनी वातानुकू लित बसगाड्या दाखल होण्यास विलंब होत आहे. बसगाड्यांची सद्य:स्थिती प्रवाशांना मोबाइलवर किं वा बस स्थानकांवरील इंडिके टरवर समजावी, बसमध्ये पुढच्या स्थानकाची होणारी उद्घोषणा इत्यादीसाठी नवीन बसमध्ये आयटीएमएस(इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम) यंत्रणा बसविण्यात येत असून टाळेबंदीमुळे त्याला लागणारे साहित्य मिळण्यात कं त्राटदारांना अडचणी आल्या. परिणामी ऊर्वरित बससाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.  ७६५ वातानुकू लित बस एप्रिल, मेपर्यंत प्रवाशांंच्या सेवेत येणार होत्या.