News Flash

बेस्टच्या ४११ वाहनांसाठी वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नाही

नवीन वाहन असल्यास एक वर्षांनंतर वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

संग्रहित छायाचित्र

दोन वर्षांत बसच्या पीयूसीसाठी नऊ लाख खर्च

वाहनांना वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे गरजेचे असतानाही बेस्ट उपक्रमातील ४११ वाहनांना अजूनही प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. उपक्रमाकडे एकूण तीन हजार ८३० विविध प्रकारची वाहने आहेत. गेल्या दोन वर्षांत ताफ्यातील बेस्ट बसच्या पीयूसीसाठी मात्र नऊ लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी माहिती अधिकारातून ही माहिती उघड केली आहे.

नवीन वाहन असल्यास एक वर्षांनंतर वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दर सहा महिन्यानंतर हे प्रमाणपत्र वाहन मालक-चालकांनी घेतले पाहिजे.

प्रमाणपत्र न घेताच वाहन धावत असेल आणि हे वाहन पकडले गेल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अशी वाहने प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण करणारी म्हणून गणली जातात. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाकडे विविध प्रकारची किती वाहने आहेत आणि वाहनांच्या पीयूसीसाठी बेस्टने किती रक्कम खर्च केली याबाबतची माहिती विचारली होती.

3माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी बेस्टच स्वत: च्या वाहनांची पीयूसी करत नाही. तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करणार अशी टीका केली. बेस्टच्या अन्य वाहनांची पीयूसी झाली नसून पर्यावरणाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांना पत्र पाठवून बेस्टच्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ बसगाडय़ांची पीयूसी

बेस्टकडे एकूण तीन हजार ८३० विविध प्रकारची वाहने असून यात दुचाकी, जीप, डिलिव्हरी तसेच कॅश व्हॅन, सीएनजी, डिझेल आणि इलेक्ट्रिसिटीवरील बस आणि अन्य वाहने आहेत. २०१६ मध्ये बसच्या पीयूसीसाठी चार लाख ८५ हजार ४६० रुपये आणि २०१७ मध्ये ४ लाख ३७ हजार ७६० रुपये खर्च करण्यात आला आहे. या दोन वर्षांत फक्त बसची पीयूसी झाल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली, तर इतर वाहनांनी पीयूसी केलेली नाही. बेस्टकडे सीएनजीवरील दोन हजार ७८, डिझेलवरील १,३३७ आणि इलेक्ट्रिकवरील ४ बस आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 4:48 am

Web Title: best buses pollution under control certificate
Next Stories
1 खड्डेमुक्त रस्ते दिले तरच शहरे ‘स्मार्ट’!
2 काचांना काळी फिल्म असणारी ९३४ वाहने दोषी
3 मुंबई ते पुणे मार्गावर सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर
Just Now!
X