मुलुंड येथे शॉर्ट सर्किटमुळे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमध्ये आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सोमवारी सकाळी सात वाजता मुलुंड बस डेपोमधून निघाल्यानंतर देवीदयाल रोडवर ही घटना घडली. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.

सुत्रांच्या महितीनुसार, इलेक्ट्रिक बसमध्ये आग लागल्यानंतर काही क्षणांमध्येच अग्निशामन दलाच्या गाड्या पोहचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या अग्निशमन दलाचे जवान आणि बेस्ट कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण
Ragging of disabled girl
पुणे : दिव्यांग मुलीची रॅगिंग; रॅगिंग सहन न झाल्याने ब्रेन स्ट्रोक!

“आज बसमध्ये जो प्रकार घडला तो एअर लीकेजमुळे ब्रेक शू गरम झाल्यामुळे घडला आहे. कुठल्याही वाहनाचा विचार केला तर ही सर्वसाधारण बाब आहे ज्यामुळे ओव्हर हिटिंगची घटना घडली. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्या हाताळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सगळ्या बसेसमध्ये पुरवण्यात आली आहे. तरीही या घटनेची चौकशी करण्यात येत आहे,” ओलेक्ट्रा बीवायडीच्या प्रवक्त्यानं सांगितले.

(याआधी या बातमीमध्ये fotonpmi या कंपनीच्या बसचा फोटो नजर चुकीने वापरण्यात आला होता. )