05 July 2020

News Flash

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी संपावर

९ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष राव यांनी दिली.  

वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मागण्यांसाठी आंदोलन

मुंबई : वेतन करार आणि करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मासिक अंतरिम वाढ, सानुग्रह अनुदान आदी मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून तशी नोटीसही बेस्ट उपक्रमाला देण्यात आल्याचे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

वेतन करार व त्याच्याशी संबंधित मुद्दय़ावरून गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट वर्कर्स युनियन व बेस्ट उपक्रमात वाद सुरू आहे. राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाला मुंबई औद्योगिक संबंध अधिनियमातून (बीआयआर अ‍ॅक्ट) वगळल्याने सर्वच युनियनसोबत चर्चा आणि करार करण्याचा मार्ग मोकळा झाला. आधी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेस्ट वर्कर्स युनियनसोबतच करार केला जात होता. मात्र बीआयआर रद्द होताच बेस्ट उपक्रमाने  शिवसेना, भाजप युनियनशी चर्चा केली आणि त्यांनी वेतन करार मान्य केल्याने या दोन युनियनच्या ९ हजार सदस्यांना करारानुसार वेतन लागू केले. अन्य कर्मचाऱ्यांचा तिढा सुटण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विविध बेस्ट युनियनसोबत चर्चा सुरू केली आहे. मात्र बेस्ट वर्कर्स युनियनने त्याला विरोध केला आहे. वेतन करार यांसह विविध मागण्यांसाठी युनियनने बेस्ट उपक्रमाला संपाची नोटीस बजावली आहे. ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष राव यांनी दिली.

बेस्ट वर्कर्स युनियनबरोबरच वाटाघाटी करून अंतिम करार करावा, मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट उपक्रमासंबंधी ‘क’ अर्थसंकल्प पालिकेच्या ‘अ’अर्थसंकल्पात विलिन करण्याबाबत बेस्ट समिती व पालिकेच्या सभागृहात मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीकरिता मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या रकमे इतके सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी, ११ जून २०१९ रोजी मुंबई पालिका, बेस्ट उपक्रम व बेस्ट वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाचा ताफा ३ हजार ३३७ करण्यासाठी तातडीने बेस्ट उपक्रमाच्या स्वत:च्या मालकीच्या बस विकत घेण्यात याव्या, अशा मागण्या युनियनने केल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:41 am

Web Title: best employee strike from 9 october zws 70
Next Stories
1 पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा बोनस
2 मुंबई-पुणे डेक्कन क्वीनच्या ‘डायनिंग कार’ला नवीन साज
3 आठ महिन्यांच्या बालिकेवर यकृत प्रत्यारोपण
Just Now!
X