News Flash

‘बेस्ट’ कर्मचारी आज आझाद मैदानात मंत्रालयावर मोर्चा नेण्यास परवानगी नाही

बुधवारी आझाद मैदानातच एल्गार पुकारण्याचा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

मुंबई : बेस्ट उपक्र माचा अर्थसंकल्प मुंबई महापालिके च्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करावा, यासह अन्य मागण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने १७ फे ब्रुवारी रोजी ‘चलो मंत्रालया’ची हाक दिली होती. मात्र, राणी बाग ते मंत्रालय दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने बुधवारी आझाद मैदानातच एल्गार पुकारण्याचा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

गेली काही वर्षे सातत्याने बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा वाढत आहे. बेस्टच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात विद्युत विभागालाही तोटय़ात जाणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. बेस्टने सध्या भाडेतत्त्वावर बसगाडय़ा घेऊन खासगीकरण सुरू के ले आहे. बेस्टला सावरण्यासाठी मुंबई महापालिके ने निधी देण्याची गरज आहे. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिके च्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी कामगार संघटनांकडून गेल्या तीन ते चार वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. याच मागण्यांसाठी मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ‘बेस्ट’ कर्मचारी संघटनांनी दिला होता. मात्र, राज्य सरकारने मोर्चाला परवानगी नाकारल्याने दुपारी ३ वाजता आझाद मैदानात कर्मचारी जमतील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2021 12:12 am

Web Title: best employees are not allowed to march on the mantralaya at azad maidan today zws 70
Next Stories
1 टर्की काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या तयारीत; पाकिस्तानसोबत भारताविरुद्ध रचला मोठा कट
2 Shame on you China : म्यानमारमधील सत्तांतरणाविरोधात चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलन
3 मुलींच्या कॉलेजसमोर मोठा आवाज असणारी बुलेट चालवणाऱ्यावर कारवाई; ५६ हजारांची पावती फाडली
Just Now!
X