27 January 2020

News Flash

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची अद्यापही पुर्तता नाही, पुन्हा संपावर जाणार

येत्या ६ ऑगस्ट पासून कर्मचारी पुन्हा संपाचे हत्यार उपसतील, असे बेस्ट कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे, त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनाला संपाचा इशारा दिला आहे. यापूर्वी याच वर्षी जानेवारी महिन्यात बेस्टचे कर्मचारी संपावर गेले होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या ६ ऑगस्ट पासून कर्मचारी पुन्हा संपाचे हत्यार उपसतील, असे बेस्ट कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

दि बी. ई. एस. टी. या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेस्ट प्रशासनाला याबाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्याची पुर्तता झाली नसल्याचे म्हटले आहे. जानेवारी महिन्यात पुकारलेल्या संपानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे कारण देत याबाबत प्रशासनाने चर्चा थांबवली. मात्र, आता यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा.

मुंबई हायकोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांना २००७ पासून १० टक्के वेतनवाढीचे तसेच १ जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीचे आदेश कोर्टाने दिले होते. याची अंमलबजावणी झाली मात्र, त्यात पुन्हा खंड पडला. ही अंमलबजावणी पुन्हा सुरु व्हावी. बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना २००७ पासून ७९३० रुपयांनी सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत वेतन निश्चिती करावी.

अनुकंपा तत्वावरची भरती प्रक्रिया त्वरीत सुरु करावी. कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा. एप्रिल २०१६ पासून लागू होणाऱ्या नव्या वेतन कराराचा तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच ठरावाप्रमाणे बेस्टच्या ‘क’ अर्थसंकल्पाचे महानगरपालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलिनिकरण करावे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्य ६ ऑगस्ट पासून पुन्हा संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

First Published on July 22, 2019 9:25 pm

Web Title: best employees demands still do not settle again will go on strike aau 85
Next Stories
1 अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून चार वर्ष केला बलात्कार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
2 मुंबई: एमटीएनएलच्या इमारतीला आग, ६० पेक्षा अधिक जण सुखरुप बाहेर
3 डोंबिवलीतल्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
Just Now!
X