09 July 2020

News Flash

‘क्यूआर कोड’द्वारे प्रवास भाडे

करोनाकाळात रोख रकमेची देवाणघेवाण टाळण्यासाठी बेस्टची नवीन सुविधा

करोनाकाळात रोख रकमेची देवाणघेवाण टाळण्यासाठी बेस्टची नवीन सुविधा

मुंबई : करोनाकाळात रोख रकमेची देवाणघेवाण टाळण्यासाठी ‘क्यूआर कोड’द्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा बेस्ट उपक्रमाकडून या आठवडय़ात सर्वच बसगाडय़ांमध्ये सुरू के ली जाणार आहे. यासाठी वाहकाकडे क्यूआर कोड ओळखपत्र देण्यात येईल, तर प्रवासी मोबाइलद्वारे कोड स्कॅ न करून यूपीआय अ‍ॅपद्वारे प्रवास भाडे भरू शके ल.

नियमित बससेवा सुरू झाल्यानंतर बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ८ लाख २६ हजारांच्याही पुढे गेली आहे. प्रवास भाडे घेताना चालक-वाहकांचा प्रवाशांशी संपर्क येतो. रोख रक्कम स्वीकारताना करोना संसर्गाचा धोका कायम असतो. ही देवाणघेवाण टाळण्याकरिता क्यूआर कोडद्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा आणण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून वडाळा आगारांतर्गत आणि २६ जूनपासून कु लाबा आगारांतर्गत काही मोजक्याच बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली. त्याचा प्रतिसाद चांगला असल्याने या आठवडय़ात बेस्टच्या सर्व आगारातील बसमध्ये सुविधा राबविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सुविधा कशी?

’ फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, पेएटीएम, एचडीएफसी पेझॅप, एअटेल पेमेन्ट बँक अशा यूपीआय अ‍ॅपमधील क्यूआर कोड पद्धतीच्या सहाय्याने प्रवाशांना प्रवास भाडे भरता येईल.

’ बस वाहकाकडे क्यूआर कोड असलेले ओळखपत्र असेल. प्रवाशाने प्रवासाची माहिती दिल्यानंतर वाहक प्रवास भाडे सांगेल.

’ त्यानंतर प्रवासी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे वाहकाकडील क्यूआर कोड स्कॅ न करून कोणत्याही एका यूपीआय अ‍ॅपद्वारे भाडय़ाची रक्कम अदा करेल.

’ ही रक्कम भरताच प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवर अदा के लेली रक्कम, बस वाहकाचा परिचय क्र मांक आणि आगार प्रदर्शित होईल. वाहकाने या माहितीची खात्री के ल्यानंतर प्रवाशाला तिकीट दिले जाईल.

उर्वरित रक्कम वाहकाकडून जमा

बस वाहकाचा कामकाजाचा कार्यकाळ संपताच तिकीट व रोख रक्कम आगारात जमा करताना संबंधित रोखपाल त्याच्या संगणकावर उपलब्ध असलेली माहितीद्वारे वाहकाने क्यूआर कोडद्वारे विकलेल्या तिकिटांची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वाहकाकडून जमा करून घेणार आहे. ज्या प्रवाशाला रोख रक्कम व्यवहार टाळायचा असेल तो ही सुविधा घेऊ शकतो. त्यासाठी मोबाइलवर यूपीआय अ‍ॅप असणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:19 am

Web Title: best facility to pay travel fare through qr code zws 70
Next Stories
1 बेस्टमधील ३० कर्मचारी बडतर्फ
2 पालिकेच्या दवाखान्यात प्रतिजन चाचणी
3 किरकोळ दुकानदारांना फटकाच
Just Now!
X