13 August 2020

News Flash

‘बेस्ट’ची प्रवासी संख्या ९ लाखांपार

सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने बसचाच पर्याय

सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने बसचाच पर्याय

मुंबई : बेस्ट उपक्र माची प्रवासी संख्या ९ लाखांहून अधिक झाली आहे. सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच मोठय़ा प्रमाणात खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांची  उपस्थितीची शक्यता असल्याने बेस्ट प्रवासी संख्या वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

८ जूनपासून मुंबई महानगर परिसरात ‘बेस्ट’कडून नियमितपणे बसगाडय़ा चालविण्यास सुरुवात के ली. यामध्ये प्रत्येक आसनावर एक प्रवासी व उभ्याने पाच प्रवासी अशी अट घालण्यात आली आहे. परंतु या नियमाचे पालन होताना दिसत नाही. ही सेवा देताना ३,५०० पैकी सुरुवातीला फक्त २,५०० पर्यंत बसगाडय़ा धावत होत्या. तर यामध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच्या ६०० आरक्षित बसचाही समावेश होता. सामान्य प्रवाशांच्या वाटय़ाला कमी बस येत असल्याने मोफत प्रवास असलेल्या विशेष बस टप्प्याटप्यात बंद के ल्या जात आहे.

बेस्ट उपक्र माने दिलेल्या माहितीत, ८ जूनला प्रवासी संख्या ४ लाख १९ हजार एवढी होती. त्यावेळी उत्पन्न ४० लाख ४४ हजार मिळाले होते. २९ जूनपर्यंत बेस्टची प्रवासी संख्या ९ लाख १० हजार ७३३ एवढी झाली आहे. त्यासाठी २ हजार ९४८ बस चालवण्यात आल्या. तर उत्पन्न ८३ लाख ९१ हजार ३५३ पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

सध्या ‘बेस्ट’मधून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सरकारी कर्मचारी व अन्य प्रवासीही प्रवास करत आहेत. यात खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खासगी कार्यालयात १० टक्के  उपस्थिती असली, तराही ती उपस्थिती आणखी वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यात सध्या सुरू असलेल्या लोकलमधून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसल्याने ‘बेस्ट’चाच पर्यायही राहात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:24 am

Web Title: best has more than 9 lakh passengers zws 70
Next Stories
1 एसटीची ‘सेवा’ विस्कळीत
2 प्रतिबंधित क्षेत्रातच पाणी, शौचालयाच्या तक्रारी अधिक
3 करोना अहवाल रुग्णालयांनाही कळवा
Just Now!
X