मुंबई : भाडेकपातीनंतर बेस्ट उपक्रमाने ताफ्यात नवीन वातानुकूलित मिनी बसगाडय़ा दाखल करण्याचा  निर्णय घेतला. त्यानुसार काही मार्गावर बससेवा सुरू आहे. सध्या या बसगाडय़ांची संख्या ५५ पर्यंत पोहोचल्याने आणखी १२ मार्गावर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

यात बस क्रमांक ५४ कोहिनूर पीपीएल-सिद्धिविनायकमार्गे, ए-५५ कोहिनूर पीपीएल (गडकरी चौक)-सिद्धिविनायकमार्गे, बस क्र ए-१२२ बॅलार्ड पियर-अहिल्याबाई होळकर चौक-चर्चगेट, बस क्र १६७ कॉ.प्र.कृ.कुरणे चौक-वरळी ते प्रभादेवी रेल्वे स्थानक (पश्चिम), ए-३५२ राणी लक्ष्मीबाई चौक-सायन ते ट्रॉम्बे, ए-२५१ अंधेरी स्थानक पश्चिम ते सातबंगला बस स्थानक, ए-२४९ अंधेरी स्थानक पश्चिम ते सात बंगला बसस्थानक, ए-२२१ अंधेरी स्थानक पश्चिम ते जेव्हीपीडी बस स्थानक, ए-२५४ अंधेरी स्थानक पश्चिम ते वीरा देसाई मार्ग, ए-२४८ अंधेरी स्थानक पश्चिम ते रमेश नगर, ए-२३५ अंधेरी स्थानक पश्चिम ते मॉन्जिनिज केक शॉप, ए-२४२ अंधेरी स्थानक पश्चिम ते मॉन्जिनिज केक शॉप या मार्गाचा समावेश आहे. लवकरच अन्य मार्गावरही वातानुकूलित मिडी, मिनी बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.