22 October 2020

News Flash

मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० प्रवासी जखमी

विक्रोळीमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर अपघात

मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात झाला आहे. विक्रोळीमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला आहे. बस भांडूप येथून वरळी डेपोच्या दिशेने जात असताना हा अपघाता झाला. बसमध्ये २० ते २२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात ८ ते १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, समोर आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकावर जाऊन आदळली. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली जात आहे. तसंच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. ती सुरळीत करण्याचं कामही सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:12 pm

Web Title: best mini bus accident in worli mumbai sgy 87
Next Stories
1 “तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावली”; आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांचे पुत्र तेजस ठाकरेंचं कौतुक
2 आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरच नव्याने सुरुवात
3 विकासासाठी ६७४ भूखंड
Just Now!
X