28 September 2020

News Flash

‘बेस्ट’च्या आगारांमध्ये आता पार्किंगची व्यवस्था

‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. मुंबईभर असलेल्या बेस्टच्या २६ आगारांच्या जमिनीचा वापर

| June 16, 2014 02:57 am

‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. मुंबईभर असलेल्या बेस्टच्या २६ आगारांच्या जमिनीचा वापर दिवसा पार्किंगसाठी करून बेस्ट प्रशासन अतिरिक्त महसूल गोळा करण्याच्या विचारात आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा खासगी वाहनांना पार्किंगसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्टची २६ आगारे आहेत. या आगारांमधील बहुतांश बसगाडय़ा दिवसभर मुंबईच्या रस्त्यांवर धावत असतात. अशा वेळी आगारातील मोकळ्या जागेचा वापर करून उत्पन्न मिळवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ही योजना आखली आहे. या आगारांमधील जागा खासगी वाहनांना पार्किंगसाठी देण्यास कंत्राटदारांना कंत्राट देण्यात येईल. कंत्राटदारांनी प्रत्येक आगारात २० दुचाकी, १० चारचाकी आणि पाच अवजड वाहने उभी करण्यासाठीची परवानगी मागितली आहे. आगारात पार्किंगच्या प्रस्तावाल मंजुरी मिळाल्यास महिन्याचे ठराविक भाडे घेण्याची योजनाही आहे.
बेस्टच्या बसगाडय़ा किमान १२ तास रस्त्यावर असल्याने आगारातील पार्किंग व्यवस्था १२ तासांसाठी असेल. त्यासाठी ठरवून दिलेल्या गाडय़ांनाच आगारात पार्किंगसाठी प्रवेश दिला जाईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अडचण येणार नाही. आगारातील पार्किंगसाठीचे दरपत्रकही ठरवून देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 2:57 am

Web Title: best plans parking for private vehicles at bus depots
टॅग Best,Parking
Next Stories
1 पोलीस भरती मृत्यू प्रकरण : उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
2 गृहमंत्र्यांनी १०० मीटर धावून दाखवावे
3 आजपासून ‘यशस्वी भव’चा आरंभ
Just Now!
X