News Flash

बेस्टच्या वीज विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

सहकारी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण

(संग्रहित छायाचित्र)

सहकारी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण

मुंबई : बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात मीटर टेस्टिंगचे काम करणाऱ्या एका ५६ वर्षांच्या कर्मचाऱ्याचे करोनामुळे मंगळवारी रात्री निधन झाले. टिळकनगरला राहणारा हा कर्मचारी वडाळा येथे कामाला येत असे. २३ मार्चपासून त्यांना ताप येत होता. १ एप्रिलला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

करोना झालेला हा कर्मचारी १८ व १९ मार्च रोजी रजेवर होता व तो आपल्या गावी गेला होता. २१ मार्चपर्यंतच तो कामावर येत होता, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २३ मार्चनंतर ते कामावर आले नाहीत. २३ मार्चला त्यांना ताप येत होता. मात्र सर्व दवाखाने बंद असल्यामुळे त्यांनी स्वत:च औषध-उपचार केले. प्रकृती सुधारत नसल्यामुळे त्यांना टिळकनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१ एप्रिलला त्यांना करोना झाल्याचे कळल्यानंतर ते राहत असलेली इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. तर ते ज्या विभागात काम करत होते तो विभागही बंद करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरीच विलगीकरण करून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या आरोग्याची देखरेख प्रशासनातर्फे सुरू आहे.

वाहकालाही करोना

बेस्टच्या गोरेगाव डेपोत काम करणाऱ्या एका वाहकालादेखील करोना झाला आहे. ते भाईंदर येथे राहणारे असून सध्या मीरा रोडच्या रुग्णालयात दाखल आहेत. ते ९ एप्रिलपर्यंत कामावर येत होते. त्यामुळे त्यांना कर्तव्यावर असताना लागण झाली असावी असे इतर कर्मचाऱ्यांना वाटते आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी धास्तावलेले आहेत.

वडाळा ते खारघर या ५०४ क्र मांकाच्या बेस्ट बसला सकाळी आठच्या सुमारास लॉरेन्स सिग्नलजवळ एका टेम्पोने धडक दिली. ही धडक बस चालकाच्या केबिनला बसली. धडक एवढी जोरदार होती की बस विरुध्द दिशेला फिरली. बस आणि टेम्पोमधील एकूण पाच जण या अपघातात जखमी झाले. बेस्ट बसच्या समोरच्या काचा फुटल्या असून बसच्या पुढील व उजव्या बाजूचेही नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:49 am

Web Title: best power employee died due to coronavirus infection zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समाजमाध्यमांवरच कलाकारांचे गप्पांचे फड
2 Coronavirus : धारावीत आणखी एकाचा मृत्यू ; करोनाबाधितांची संख्या ६०वर
3 बोरीबंदर-ठाणे पहिल्या रेल्वेसेवेला १६७ वर्ष पूर्ण
Just Now!
X