06 March 2021

News Flash

विजेवर धावणाऱ्या आणखी १०० बस

‘बेस्ट’च्या ताफ्याचा मार्चपर्यंत विस्तार

(संग्रहित छायाचित्र)

‘बेस्ट’च्या ताफ्याचा मार्चपर्यंत विस्तार

मुंबई : बेस्ट उपक्रमाने इंधन बचतीचा मंत्र जपत आपल्या ताफ्यात पर्यावरणस्नेही बसगाडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर धावणाऱ्या १०० पेक्षा अधिक बसगाडय़ा मार्च २०२१ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे ताफ्यातील विजेवरील बसगाडय़ांची संख्या वाढून २०० च्या घरात पोहोचेल.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम-२’अंतर्गत विजेवरील बसगाडय़ांची योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बेस्टच्या ताफ्यात ३४० बसगाडय़ा दाखल करण्याचा निर्णय झाला होता. यामध्ये २०० मिडी आणि १४० एकमजली बसगाडय़ांचा समावेश आहे. मिडी बसमध्ये काही वातानुकूलित, तर काही विनावातानुकूलित बस आहेत. एका आठवडय़ात किंवा दहा दिवसांत २५ बस याप्रमाणे महिन्याला विजेवरील १०० बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या बेस्टच्या ताफ्यात विजेवरील ९६ बस असून त्या मिडी वातानुकूलित व सिंगर डेकर स्वरूपाच्या आहेत. आता मार्च महिन्याच्या अखेपर्यंत आणखी १०० पेक्षा जास्त मिडी वातानुकूलित बस ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे विजेवरील बसची संख्या २०० पर्यंत पोहोचेल. मार्चपर्यंत विजेवरील बसचा ताफा एकू ण ३८६ पर्यंत नेण्यात येणार होता. परंतु त्यात बेस्टला अपयशच आले आहे. सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा पूर्णपणे सुरू  झालेली नाही. त्याप्रमाणे येणाऱ्या नवीन बसगाडय़ांचे नियोजन के ले जाणार आहे. याशिवाय रुग्णालये, सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांनाही सेवा देण्यासाठी या बसचा मार्ग निश्चित के ला जाणार आहे.

दररोज २५ लाख प्रवासी

करोनाकाळापूर्वी बेस्ट बसगाडय़ांमधून ३३ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करत होते. टाळेबंदीत हीच संख्या कमी झाली. परंतु जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होऊ लागली. सरकारी व खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविण्यात आली. परिणामी, बेस्ट प्रवाशांची संख्या काही प्रमाणात वाढून साधारण २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यातील ३,५०० बसगाडय़ांबरोबरच भाडेतत्त्वावरील एसटीच्या ८०० बसगाडय़ाही प्रवाशांच्या सेवेत आहेत. मार्चमध्ये ताफ्यातील बसची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे प्रवास काहीसा सुकर होण्यास मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:25 am

Web Title: best to get 100 electric buses till march 2021 zws 70
Next Stories
1 पाल्र्याच्या दीनानाथ नाटय़गृहाची डागडुजी सुरूच
2 ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांसाठी पालिके चे ५० कोटी
3 ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा’
Just Now!
X