News Flash

पूर्व मुक्त मर्गावरुन बेस्टची बस सेवा

वाशी आगार ते जागतिक व्यापार केंद्रापर्यंत बस क्रमांक ‘सी-५०’ आणि शिवाजी नगर ते मंत्रालयापर्यंत बस क्रमांक ‘सी-८’ या दोन जलद बस शनिवारपासून पूर्व मुक्त मार्गावरुन

| July 2, 2013 02:54 am

वाशी आगार ते जागतिक व्यापार केंद्रापर्यंत बस क्रमांक ‘सी-५०’ आणि शिवाजी नगर ते मंत्रालयापर्यंत बस क्रमांक ‘सी-८’ या दोन जलद बस शनिवारपासून पूर्व मुक्त मार्गावरुन सुरू करण्यात आल्या. वाशी आगार येथून सकाळी ८.३० आणि ९ वाजता, तर मंत्रालय येथून सायंकाळी ५.३० आणि ६ वाजता परतीच्या प्रवासासाठी या बस उपलब्ध होतील. मात्र ही बस सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते या बस शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम-पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, नगरसेवक विठ्ठल खरटमोल, नगरसेविका उषा कांबळे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:54 am

Web Title: best transport starting bus service on free expressway
टॅग : Best,Bus
Next Stories
1 महिला पोलिसांशी असभ्य संभाषण करणाऱ्यांना अटक
2 पश्चिम रेल्वे विस्कळीत
3 मार्वे समुद्रात बुडालेल्या तीन विद्यार्थाचे मृतदेह मिळाले
Just Now!
X