बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी ९ जुलैपासून पास वितरण व नुतनीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाची नियमित बस सेवा ८ जूनपासून सुरू झाल्यानंतरही पास सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागत होता. आता २२ मार्च ते ७ जून या कालावधीत ज्या प्रवाशांना उपक्र माच्या बस सेवेचा लाभ घेता आला नव्हता, त्या प्रवाशांच्या बसपासचा वैधता कालावधी ‘उपभोगता न आलेल्या शिल्लक दिवसांच्या कालावधीकरीता’ विस्तारीत करण्यात येत आहे. प्रवाशांना या विस्तारीत कालावधीची वेगळी पावती प्रदान करण्यात येईल. या पावतीवर ‘विस्तारित’ वैधता कालावधी दर्शविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 12:46 am