News Flash

निवडणुकीवर कोटय़वधींचा सट्टा

क्रिकेटप्रमाणे देशभरातील सट्टेबाजांनी निवडणुकीवरही मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आजमितीस देशभरात किमान २० हजार कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे.

| April 14, 2014 02:30 am

क्रिकेटप्रमाणे देशभरातील सट्टेबाजांनी निवडणुकीवरही मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आजमितीस देशभरात किमान २० हजार कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. सट्टेबाजांची पसंती सध्यातरी नरेंद्र मोदींना असल्याने सर्वात जास्त सट्टा त्यांच्या नावावर आहे. पण इतरही शक्यता गृहीत धरून त्यावर सट्टा लावण्यात आलेला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा निवडणुकीवर सट्टा लावण्यासाठी सट्टेबाज गेल्या महिन्याभरापासून सक्रिय झाले आहेत. आचारसंहिता लागताक्षणी या सट्टेबाजीला वेग आला होता. आता ही सट्टेबाजी ऐन रंगात आलेली आहे. एनडीए सरकारवर ४० पैसे तर युपीए सरकावर ८० पैसे एवढा सट्टा लावण्यात आलेला आहे. सट्टेबाजांनी कोण किती जागा जिंकणार यावरही सट्टा लावलेला आहे. भाजपाला २०० जागा मिळाल्या तर २० पैसे आणि २२५ हून अधिक जागा मिळाल्या तर १ रुपया असा भाव लावण्यात आला आहे. कॉंग्रेसला ६८ ते ७० जागा मिळाल्यातर ४५ पैसे आणि १०० जागा मिळाल्या तर १ रुपयांचा भाव ठेवण्यात आला आहे. आप पक्षावरही सक्षणीय सट्टा लावण्यात आला आहे.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला सटट्ेबाजांची सर्वाधिक पसंती असून त्यांचा दर ४० पैसे आहे. तर राहुल गांधीवर ८० पैसे आहेत. सट्टेबाजांनी सर्व शक्यता गृहीत धरल्या असून त्रिशंकू सरकार येणार, असे गृहीत धरूनही सट्टा लावला आहे.
आयपीएल मधील सटट्ेबाजी प्रकरणात मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी मोठी मोहिम उघडली होती. त्यामुळे सट्टेबाज सावध झाले आहेत. त्यांचे व्यवहार अधिक गोपनीय पद्धतीने केले जात आहे. मुंबई पोलिसांनीही सट्टेबाजाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली असून येत्या काही दिवसात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:30 am

Web Title: betting on election politics betting
Next Stories
1 शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
2 आक्सा समुद्रकिनाऱ्यावर सहा मुलांना वाचविले
3 सामान्यांच्या असामान्य कर्तृत्त्वाला रेल्वेचा सलाम
Just Now!
X