News Flash

इंधन दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी!

सामनातून उद्धव ठाकरेंनी इंधन दरवाढीचा निषेध करत टीकास्त्र सोडलेले असले तरीही सोमवारी हे दोन्ही नेते सिद्धिविनायक मंदिरात एकत्र आलेले बघायला मिळाले

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचा निषेध करत आज काँग्रेसने देशव्यापी बंदची हाक दिली. शिवसेनेनेही सामनातून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत सरकारवर टीका केली. तर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या बंदला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. देशात आणि महाराष्ट्रात या बंदला प्रतिसाद मिळत असताना राज्याचे सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आले होते.

भारतीय पोस्ट विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला. या सोहळ्यासाठी हे दोन नेते एकत्र आले होते. भारतीय पोस्ट विभागातर्फे माय स्टॅम्प ही योजना करण्यात आली. या योजने अंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी मिळणार आहे.

सामनातून उद्धव ठाकरेंनी इंधन दरवाढीचा निषेध करत टीकास्त्र सोडलेले असले तरीही सोमवारी हे दोन्ही नेते सिद्धिविनायक मंदिरात एकत्र आलेले बघायला मिळाले. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात विरोधक रस्त्यावर आणि सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:20 pm

Web Title: bharat band congress and opposition partis on road uddhav thackeray and cm devendra fadnavis in siddhivinayak temple
Next Stories
1 सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या पोस्टल स्टँपचे प्रकाशन
2 बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी
3 जनता जागीच आहे, 2019 मध्ये सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील – उद्धव ठाकरे
Just Now!
X