28 November 2020

News Flash

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक, एनसीबीची कारवाई

भारती आणि तिच्या पतीने गांजा बाळगल्याचं केलं मान्य

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला आहे. तो एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने भारतीच्या ऑफिस आणि घरावर छापा मारला त्यामध्ये त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर आज सकाळीच भारतीला ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र आता तिला अटक करण्यात आली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर ही छापेमारी करण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्धी कॉमेडियन भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे. एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना समन्स बजावलं होतं. आता तिला अटकही करण्यात आली आहे.

कोण आहे भारती सिंह?

भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 6:43 pm

Web Title: bharti singh arrested in drugs case by ncb scj 81
Next Stories
1 ‘तोरबाज’च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त ‘मसीहा’च्या भूमिकेत
2 …म्हणून ‘राऊडी बेबी’च्या यशानंतर साई पल्लवीचे चाहते झाले नाराज
3 अक्षय कुमारच्या ५०० कोटींच्या दाव्यावर यूट्यूबर राशिदने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
Just Now!
X