20 September 2020

News Flash

भास्कर जाधव राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष; कार्याध्यक्षपदी जितेंद्र आव्हाडांची वर्णी

* कार्याध्यक्षपदी जितेंद्र आव्हाडांची वर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चिपळूनचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची निवड आज शनिवार करण्यात आली.

| June 15, 2013 12:25 pm

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चिपळूनचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची निवड आज शनिवार करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे मावळते प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केली. सरकारपाठोपाठ पक्षसंघटनेत बदल करण्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भर दिला असून, तरुण चेहऱ्याला संधी देण्याचे पवार यांनी सूचित केल्याने ही जबाबदारी कोणावर पडते याबाबत पक्षात उत्सुकता होती. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना भास्कर जाधव यांनी स्वत:च्या मुलाच्या लग्नावर प्रचंड उधळपट्टी केल्याप्रकरणी स्वत: शरद पवार यांनी भास्कर जाधवांची कानउघडणी केली होती. त्यामुळे आजच्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
तरुण चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:25 pm

Web Title: bhaskar jadhav elected for ncp state chief
टॅग Bhaskar Jadhav,Ncp
Next Stories
1 डिस्लेक्सियाग्रस्त विद्यार्थिनीला दिलासा
2 हा माझा प्रताप नाही!
3 नवी मुंबईपाठोपाठ चाकण विमानतळाच्या जागेचाही घोळ
Just Now!
X