रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांना गुहागर नगरपंचायत निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. भास्कर जाधव स्वत: गुहागरमधून आमदार आहेत. पण गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. शिवसेनेलाही फक्त एकच जागा मिळाली आहे पण शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेच्या पाठिंब्याने शहर विकास आघाडीची सत्ता येणार आहे.

शिवसेनेने भास्कर जाधव यांच्यावर नाराज असलेल्यांना एकत्र करुन त्यांची मोट बांधली. याच शहर विकास आघाडीने भास्कर जाधव यांना धक्का दिला. भास्कर जाधव हे आधी शिवसेनेमध्ये होते पण शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध मंत्रिपदे भूषवणारे जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.

Vijay Wadettiwar talk on new symbol ncp
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हावर वडेट्टीवार म्हणाले, “तुतारी वाजवायला ‘हात’… ”
zeeshan siddique
मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवताच झिशान सिद्दीकी आक्रमक; म्हणाले, “येत्या दोन-तीन दिवसांत…”
Chandrashekhar Bawankule Jayant Patil Vijay wadettiwar
भाजपा मविआला धक्का देणार? जयंत पाटील-विजय वडेट्टीवार संपर्कात? बावनकुळे म्हणाले, “आमच्या संकल्पाला साथ…”
nana patole and devendra fadnavis
भाजपाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “योग्य वेळी…”

भास्कर जाधव आधी चिपळूणचे आमदार होते. मतदारसंघ फेररचनेनंतर ते गृहागरमधून विधानसभेवर गेले. त्यांच्याच कार्यकाळात गुहागर नगरपंचायत अस्तित्वात आली पण आता त्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला आहे. या नगरपंचायतीत भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला आहे.